शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपासून पर्यावरण अहवालच नाही, प्रशासनाची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:00 IST

दिल्लीसह मुंबईत प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्राच्या बाजूलाच असलेले तारापूर सर्वाधिक प्रदूषित आहे.

विरार : दिल्लीसह मुंबईत प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्राच्या बाजूलाच असलेले तारापूर सर्वाधिक प्रदूषित आहे. असे असताना वसई - विरार महानगरपालिकेने मात्र चार वर्षापासून पर्यावरण अहवालच काढला नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पालिका शहरातील पर्यावरणाच्या समस्येबाबत किती जागरु क आहे, ते उघड झाले आहे. पालिकेच्या या कारभारावर आता पर्यावरणप्रेमींकडून कडाडून टीका केली जात आहे.शहरातील वाढती अनधिकृत बांधकामे, वाहनांची संख्या आणि वाहतूक कोंडी ही कारणेही पर्यावरण ºहासाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहेत. त्यातच शहरातील केमिकल कंपन्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची देखील चर्चा असते. शहरात प्रदूषणासंदर्भात इतके गंभीर विषय असतानाही पालिकेच्या संकेत स्थळावर मात्र पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०१३-१४ व २०१४-१५ चाच अहवाल दाखवला जात आहे. तर आतापर्यंत म्हणजेच पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ चा अहवाल पालिकेने काढलाच नसल्याचे समोर आले आहे.वास्तविक, पालिकेकडून दरवर्षी जाहीर होणारा पर्यावरण अहवाल हा शहरातील पर्यावरणाची सध्याची स्थिती दर्शवत असतो. पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर पालिकेने काय कारवाई केली, या संदर्भातील माहितीही या अहवालातून मिळत असते. त्यामुळे शहरात पर्यावरणाची हानी करणाºयांमध्ये कायद्याचे पालन करण्याची मानसिकता वाढू शकते. मात्र पालिका दरवर्षी हा अहवालच काढत नसल्याने महापालिका या विषयाप्रती किती गंभीर आहे, हे लक्षात येते.पालिका पर्यावरणासारख्या गंभीर प्रश्नाबाबत इतकी बेजबाबदार असूच कशी शकते असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.>शहरातील पर्यावरण सद्यस्थिती अहवालाबाबत आमची चौकशी सुरु आहे. तसेच पर्यावरण विभागाच्या अधिकाºयांशी बोलणे झाले असून दोन ते तीन दिवसात हा अहवाल प्राप्त होणार आहे.- बी.जी.पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका