शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील खेड्यापाड्यात महावितरणचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:50 IST

डहाणूच्या पश्चिम किनाऱ्यापट्टीवरील सुमारे ६० गावे, खेड्यापाड्यात काळोख पसरला आहे.

- शौकत शेखडहाणू : डहाणूच्या पश्चिम किनाऱ्यापट्टीवरील सुमारे ६० गावे, खेड्यापाड्यात काळोख पसरला आहे. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या परिसरात दिवस-रात्र वीजेच्या तारा तुटणे, ट्रान्स्फॉर्मर फेल होणे, अर्ध्या-अर्ध्या तासाने फ्यूज, डिओ, झंपर उडत असल्याने तासभर देखील वीजपुरवठा सुरळीत रहात नाही. परिणामी, वीजेवर अवलंबून असलेले आणि या भागात घरोघरी चालणारे लघु उद्योग, डायमेकिंग व्यवसाय धोक्यात आले आहेत. चार महिन्यांपासून चिंचणी, वरोर, वानगाव फिडर तसेच बोईसर येथील १३२, १३३ के.व्ही.मध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने वीजेची अव्वाच्या सवा बिले पाठवून सक्तीने वसूल करणाºया वीज महावितरण कंपनीच्या विरोधात ग्रामस्थांमध्ये संताप आहे.डहाणूच्या सुमद्र किनाºयावर वसलेल्या गाव-पाड्यात दिवसातून चार तास वीजपुरवठा खंडित होणे ही नित्याची बाब झाली आहे. तर रात्रीच्या सुमारास वाºयाची झुळूक आली तरी विजेच्या तारा तुटून पडतात. ग्रामस्थ एकत्र येऊन वायरमनला शोधून आणतात, आणि मग दोन - तीन तासांनी वीजपुरवठा सुरू होतो. परंतु रात्रभर डिओ, फ्यूज उडण्याचे सत्र सुरूच असते, विशेष म्हणजे फ्यूज किंवा डिओ टाकण्याचे काम येथील ग्रामस्थ जीव धोक्यात घालून स्वत:च करीत असतात. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील गावात १९६४ मध्ये वीजपुरवठा सुरू झाला. परंतु गेल्या ५५ वर्षात या परिसरात काहीच खास बदल झालेला नाही. जीर्ण, जुनाट विद्युत खांब कमकुवत क्षमतेचा जनित्र, गंजलेल्या विद्युत तारा, गावातील उकिरड्यावर लटकलेले फ्यूज बॉक्स तसेच लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिनीवरच महावितरण दिवस ढकलत आहे. गेल्या अनेक वर्षात या भागात सातत्याने मोर्चे, आंदोलन करून देखील महावितरण प्रशासन काही सुधारणा करीत नाही.प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीमे २०१८ च्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले खासदार राजेंद्र गावीत यांनी चिंचाणी येथील एका सभेत या परिसरातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी तीन ते चार कोटींचा निधी खर्च करून सुधारणा करण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु अद्याप कोणतीच हालचाल होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.डहाणू पश्चिम किनारपट्टीवरील गावात काही ठिकाणी महावितरणची कामे सुरू आहेत. तर अनेक गावातील सुधारणा करण्यासाठी आम्ही पालघर जिल्हा नियोजन समितीकडे काही प्रस्ताव पाठविले आहेत. निश्चितच सुधारणा होऊन ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.-प्रताप मचिये,कार्यकारी अभियंता, पालघर महावितरण कंपनी

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज