शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नितीन म्हात्रे कोकण प्रतिष्ठान श्रीचा मानकरी

By admin | Updated: April 1, 2017 05:15 IST

पालघर जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशन आणि कोकण प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कोकण श्रीचा मानकरी पॉवर

वसई : पालघर जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशन आणि कोकण प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कोकण श्रीचा मानकरी पॉवर झोनचा नितीन म्हात्रे ठरला. नालासोपाऱ्यातील हेडगेवार चौकात ही स्पर्धा पार पडली. एकूण पाच गटात झालेल्या स्पर्धेतील ५५ किलो गटात परब फिटनेसच्या संदेश सकपाळ, ६० किलो गटात पॉवर झोनच्या नितीन म्हात्रे, ६५ किलोच्या गटात आरएम भट्टच्या उमेश पांचाळ, ७० किलो गटात बॉडी वर्कशॉपच्या विलास घडावले आणि मोठ्या गटात रसूल दिब्रिटो यांनी बाजी मारली. त्यानंतर या पाच विजेत्यांमध्ये अंतिम लढत झाली. त्यात नितीन म्हात्रेने बाजी मारली. तर अभिषेक खेडेकरने बेस्ट पोझरचे पारितोषिक पटकावले.भारती श्रीचा किताब पटकावलेले नालासोपाऱ्याचे सुपुत्र कै. सहदेव नेवाळकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण मुळीक, स्वप्नील नेवाळकर, पालघर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिपंकर पाटील, चाणक्य नगरी फेडरेशनचे अध्यक्ष नितीन पेंढारी यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यात विशेषत: तरुणाईचा भरणा मोठ्या प्रमाणात होता. यापुढेही अशाच स्पर्धांचे आयोजन व्हावे अशी भावना रसिक व्यक्त करीत होते. (प्रतिनिधी)