हितेन नाईक , पालघरआपल्या व्यवसायातून मिळालेले पैसे साठवून ऐषोआराम करणारे समाजात खूप आहेत. मात्र, सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून गरीब, उपेक्षितांसाठी जगणारे निलेश सांबरे सारखे व्यक्तिमत्व खूपच कमी दिसून येत असल्याचे गौरवोद्गार खासदार चिंतामण वणगा ह्यांनी उधवा येथे लायब्ररी च्या उदघाटन प्रसंगी काढले.संस्थापक निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, झडपोली संचलित पालघर जिल्ह्यातील उधवा, तलासरी, कासा, जव्हार या पाच ठिकाणी स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले. तर अन्य अकरा ठिकाणी एसएससी च्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य व्हेकेशन क्लासेस बॅचचे उदघाटन खासदार चिंतामण वणगा, आमदार पास्कल धनारे, माजी मंत्री शंकर नम, जिप सदस्य काशिनाथ चौधरी, प.स.सदस्य प्रवीण गवळी माजी सभापती राजू पागधरे, सामाजिक कार्यकर्ते अप्पा भोये आदी मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर वसलेल्या उधवा ह्या ग्रामीण भागातील तरु णात गुणवत्ता ठासून भरली असताना स्पर्धा परीक्षांचे योग्य ते मार्गदर्शन त्यांना मिळत नसल्याने ते एमपीएसीसी, यूपीएससी परिक्षेमध्ये टिकाव धरू शकत नव्हते. आता जिजाऊ संस्थेने स्पर्धा परीक्षेचे वाचनालय सुरु केल्याने आमचे तरूण नक्कीच आयएएस, आयपीएस बनतील असा विश्वास डहाणू प.स. सदस्य गवळी ह्यांनी व्यक्त केला. ह्यावेळी आमदार धनारे म्हणाले की, स्पर्धा परीक्षा वाचनालयाद्वारे आमच्या मुलांचे उज्वल भवितव्य घडविण्याचा स्तुत्य उपक्र म सांबरे ह्यांनी सुरु केल्याने आम्ही नेहमी त्याच्या सोबत राहू. तर माजी मंत्री नम म्हणाले आपला व्यवसाय करून पैसे कमविणारे मी खूप पाहिल मात्र, आपल्या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नाच्या पैश्याचा वापर गरिबांच्या आरोग्य, शिक्षणासाठी खर्च करणारे सांबरे सारखे व्यक्तिमत्व आमच्या भागात दुर्मिळ असल्याचे उद्गार काढले.
‘निलेश सांबरेंनी जपली बांधीलकी’
By admin | Updated: April 18, 2017 06:42 IST