शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

निरी, आय.आय.टी. अहवाल थातूर-मातूर, कारवाई नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:39 IST

करोडो रुपयांचा खर्च वाया; गतवर्षीची वसई-विरार नालासोपाऱ्याची पूरस्थिती

- आशिष राणे वसई : महानगरपालिकेने करोडो रु पये खर्च करून आय.आय.टी आणि निरीकडून महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पाहणी करून सूचना मागवल्या होत्या. विशेष म्हणजे केंद्र सरकार प्राधिकृत या दोन संस्थांनी २०१९ च्या पावसाळयापूर्वी प्राथमिक स्वरुपाच्या कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या स्वरुपाचा प्राथमिक अहवाल महानगरपालिकेला दिला, परंतु या अहवालानुसार थातुरमातूर काम करण्याव्यतिरिक्त वसई-विरार महानगरपालिकेने या अहवालाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना उपशहर मिलिंद चव्हाण यांनी केला आहे.दरम्यान चव्हाण यांच्या सांगण्यानुसार हा अहवाल येण्यापूर्वीच तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे आणि आता सध्याचे आयुक्त बी.जी.पवार यांच्याशी संपर्क साधून नालासोपारा शहराचे सांडपाणी ज्या सोपारा खाडीतून वसई शहरात येते त्या खाडीचा मार्ग बदलून तिथे खाडीत भराव टाकून मैदानाचे आरक्षण टाकले असल्याचे निदर्शनास आणून दिले. परंतु याबाबत महानगरपालिकेतर्फे आजमितीला काहीच केले गेले नाही.विशेष म्हणजे आता प्रसिध्द झालेल्या या निरी तथा सत्यशोधन समितीच्या अहवालात पान क्र.२१ व २२ मध्ये देखील हा जो बदललेला मार्ग यंदाही पूरपरिस्थिती आमंत्रण देणारा असल्याचे नमूद केले आहे आणि २०१९ च्या पावसाळयापूर्वी तो पाणी जाण्यासाठी पूरक करावा, अशी सूचना असतांना देखील महानगरपालिका झोपेचे सोंग घेत आहे. कारण खाडीचा हा मार्ग महानगरपालिकेनेच भराव टाकून बंद केला आणि तिथे अनधिकृत मैदान कोणत्या लोकप्रतिनिधीच्या सांगण्याप्रमाणे केले हे एक कोडेच आहे. एकूणच या अशा कृत्यामुळे वसईच्या जनतेला पुन्हा पुरात ढकलले जाते आहे का नाही? ते महानगरपालिका आयुक्त सांगणार का? जनतेचा पैसा खर्च करून जो अहवाल मागवला आहे त्यावर अंमलबजावणी कधी व कशी करणार हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. किंबहुना महानगरपालिकेने शहरात गाळ काढण्याचे कामही पूर्णपणे केले नसून तो काढून तिथेच ठेऊन पुढच्या वर्षासाठी ठेकेदारांची आर्थिक सोय करून ठेवली असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली आहे.