शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

वारली चित्रशैलीतून साकारतोय शुभेच्छांचा नवा ट्रेंड, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी व धुळवडीच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 03:07 IST

होळी आणि धुळवड सणाच्या शुभेच्छा वारली चित्रशैलीतून व्यक्त करीत उत्सवाचा जल्लोष साजरा करण्यात आला. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाने होळी व व धुळवड साजरी करण्यास निर्बंध लादले.

बोर्डी : होळी आणि धुळवड सणाच्या शुभेच्छा वारली चित्रशैलीतून व्यक्त करीत उत्सवाचा जल्लोष साजरा करण्यात आला. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाने होळी व व धुळवड साजरी करण्यास निर्बंध लादले. त्यामुळे नेटकऱ्यांकडून हा ट्रेंड फॉलो होताना दिसला. पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मार्च महिन्यापासून वाढ नोंदवली जात आहे. जिल्हा प्रशासनाने रात्री ८ ते सकाळी ७ या काळात संचारबंदी लागू केली आहे. तर धूलिवंदन साजरा न करण्याचे आदेश जारी केले होते. होळी सणाला येथील प्रत्येक समाजाच्या संस्कृतीत प्रमुख स्थान आहे. सार्वजनिक ठिकाणी होळी पेटवून पारंपरिक गाणी व वाद्यांच्या सुरावटीवर पूजाअर्चा केली जाते. नवविवाहित जोडप्यांना वाजतगाजत आणून, होळीला नारळाची आहुती दिली जाते. या सणाच्या अनुषंगाने पुरणपोळी, विविध गोडधोडाचे पदार्थ, तर आदिवासी समाजात कैऱ्यांचा प्रसाद दिला जातो. स्वयंपाकात त्या वापरून, नातेवाईक व शेजाऱ्यांना त्याचे वाटप केले जाते. या खाद्यसंस्कृतीची ओळख व पाककलेची नव्याने भर पडत जाते. विविध वेष, सोंग घेऊन समाजबांधवांच्या घरी जाऊन पोस्त मागितला जातो. ही रूढी परंपरा वारली पेंटिंगच्या माध्यमातून कॅनव्हासवर चितारून या सणाची खास वैशिष्ट्ये उभी केली. त्यावर शुभेच्छा संदेश लिहून, ती फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नातेवाईक व मित्रपरिवाराला पाठविले. त्याला नेटकऱ्यांकडूनही उत्तम प्रतिसाद  मिळत आहे. पारंपरिक रूढी, संस्कृतीचे संवर्धन ही रूढी परंपरा वारली पेंटिंगच्या माध्यमातून कॅनव्हासवर चितारून या सणाची खास वैशिष्ट्ये उभी केली. त्यावर शुभेच्छा संदेश लिहून, ती फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नातेवाईक व मित्रपरिवाराला पाठविले. उत्सवाच्या अनुषंगाने शुभेच्छांची देवाण-घेवाण केली. यामुळे कायद्याचे पालन, पारंपरिक रूढी, संस्कृतीचे संवर्धन आणि वारली चित्रशैलीच्या प्रचारप्रसाराचे कार्य साध्य झाले. या वैश्विक रोगाच्या पार्श्वभूमीवर असे बदल समाजाने स्वीकारणे आवश्यक असल्याचे या तंत्रस्नेही पिढीचे म्हणणे आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार