शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वसईत जनआंदोलनाचा नवा राजकीय पक्ष, मोर्चेबांधणी सुरू

By admin | Updated: February 5, 2017 02:23 IST

वसई विरार महापालिका स्थापनेनंतर वसईत राजकीय धु्रवीकरण करणाऱ्या जनआंदोलन समितीने आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नव्या

- शशी करपे, वसईवसई विरार महापालिका स्थापनेनंतर वसईत राजकीय धु्रवीकरण करणाऱ्या जनआंदोलन समितीने आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यासाठी मोर्चेबांधणी सुुरु केली आहे. त्यासाठी रविवारी पहिली बैठक बोलावण्यात आली असून त्यात विवेक पंडित मार्गदर्शन करणार आहेत. २००९ साली वसई विरार महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर जनआंदोलन समितीने वसईतील राजकीय क्षेत्रात मोठे आव्हान उभे केले होते. जनआंदोलन समितीने विवेक पंडितांना आमदारकी मिळवून दिली होती. तर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत तब्बल २१ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर पंचायत समितीची सत्ता मिळवून तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेच्या सत्तेतही सामील होण्याचे काम जनआंदोलन समितीने केले होते. वसईच्या राजकीय क्षेत्रात पाय रोवून उभ्या असलेल्या हितेंद्र ठाकूरांना जनआंदोलनाने मोठा हादरा दिला होता. विवेक पंडितांनी एकीकडे शिवसेनेशी घरोबा करीत लोकहितवादी लिडर पार्टीची स्थापना केली होती. आपले कट्टर समर्थक फ्रान्सिस लोपीस यांना अध्यक्ष करून पंडितांनी लोकहितवादी लिडर पार्टीच्या बॅनरखाली वसईत आपले वेगळे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर जनआंदोलनात असलेल्या विविध पक्षातील नेत्यांनी पंडितांची साथ सोडून मूळ पक्षात स्थिरावणे पसंत केले होते. त्यामुळे जनआंदोलनाची ताकद दिवसागणिक कमकुवत होत गेली होती. याचे परिणाम दुसऱ्यांदा झालेल्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत पहावयास मिळाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत विवेक पंडित यांचा पराभव झाला. त्यानंतर पंडितांनी वसईतील राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत केले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पंडित समर्थकांची वाताहात झाली होती. परिणामी जनआंदोलन समितीची ताकद अगदी नगण्य झाली. दुसरीकडे, पंडितांनी स्थापन केलेल्या लोकहितवादी लिडर पार्टीची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली होती. त्यामुळे वसईतील राजकारणात भूकंप करणाऱ्या पंडित आणि जनआंदोलन समितीची अवघ्या पाच वर्षात वसईतील राजकारणात मोठी पिछेहाट झाली. एसटी बचाव आंदोलनात मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सध्या जनआंदोलनाची धुरा खांद्यावर घेतलेल्या डॉमणिका डाबरे, मिलिंंद खानोलकर, प्रा. विन्सेंट परेरा, प्रफुल्ल ठाकूर, सुनिल डिसिल्वा या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वसईत राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रविवारी वसईत जनआंदोलनात सक्रीय असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.