शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

नवे खांब उभारले, मुख्य रस्ता झळाळणार

By admin | Updated: March 16, 2017 02:42 IST

‘कोसळलेल्या खांबाकडे तीन वर्षे दुर्लक्ष मुख्य रस्त्यावर अंधार’ या शीर्षकाखाली मागील महिन्यांत लोकमत मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणची यंत्रणा कुंभकर्ण

पंकज राऊत ,  बोईसर‘कोसळलेल्या खांबाकडे तीन वर्षे दुर्लक्ष मुख्य रस्त्यावर अंधार’ या शीर्षकाखाली मागील महिन्यांत लोकमत मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणची यंत्रणा कुंभकर्ण निद्रेतून जागी झाली. बोईसर-तारापूर या मुख्य व प्रचंड रहदारीच्या रस्त्यावरील कोसळलेल्या खांबांच्या जागी सहा नवे खांब तिने उभारले असून लवकरच हा रस्ता झळाळणार आहे. बोईसर रेल्वे स्थानक ते चित्रालय या मुख्य रस्त्यावरील तीन वर्षापासून एका कोसळलेल्या खांबामुळे सलग पाच खाम्बा वरील वीज पुरवठा खंडित होऊन रात्री पादचाऱ्यांना रस्त्यावरुन ठेचकाळत चालावे लागत होते तर मागील २९ महिन्यांपासून खांब बदलण्या साठीचा प्रस्ताव महावितरणच्या पालघर येथील कार्यालयात धूळ खात होता. ती धूळ लोकमतच्या वृत्ताने झटकली गेली. १४ आॅगस्ट २०१४ ला ग्रामपंचायतीने बोईसरच्या एमएसईडीच्या कार्यालयाला कोसळलेला खांब बदलण्या संदर्भात कळविल्यानंतर तसा प्रस्ताव कनिष्ठ अभियंत्यानी ५ सप्टेंबर २०१४ कार्यकारी अभियंता पालघर यांच्याकडे मंजूरी करीता पाठविला. मात्र ग्रामपंचायतीसह व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आणि पाठ पुराव्या अभावी तीन वर्षे वाहन चालकाना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. आता नव्या खांबांवरून तार ही खेचण्यात आली आहे. आता लवकरच त्यावर ग्रामपंचायतीतर्फे एलइडीचे लाइट बसविण्यात येणार आहे.