शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

सोमवारपासून महिनाभर नवीन वरसावे पूल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:36 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र . ८ वरील भार्इंदर-वसई दरम्यान असलेला नवीन वरसावे पूल दुरुस्तीसाठी २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत पूर्णत: बंद राहणार आहे.

वसई : राष्ट्रीय महामार्ग क्र . ८ वरील भार्इंदर-वसई दरम्यान असलेला नवीन वरसावे पूल दुरुस्तीसाठी २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत पूर्णत: बंद राहणार आहे. या कालावधीत वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी शुक्रवारी केले. मात्र, यामुळे मुंबई-अहमदाबादसह घोडबंदर मार्गावर वाहनचालकांना यामुळे महिनाभर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागणार आहे.या पुलाच्या दुरुस्तीचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार असल्याने पहिली मार्गिका १५ दिवस बंद करण्यात येत आहे. या मार्गिकेच्या बंद कालावधीत तिच्यालगत असणाऱ्या दुसºया मार्गिकेवरून हलक्या वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर मार्गिकेलगत असलेल्या दुसºया मार्गिकेचे काम सुरू केले जाईल. या कालावधीत या मार्गिकेवर हलक्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात येऊन दुरु स्त झालेल्या पहिल्या मार्गिकेवरून पुन्हा हलक्या वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येईल, असेही जिल्हाधिकाºयांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. या कालावधीत नवीन वरसावे पुलावरून सुरतकडून मुंबई-ठाणे-दहीसर वाहतूक करण्याकरिता सर्व जड-अवजड वाहनांना मनाई करण्यात येईल आणि याच जड वाहनांची वाहतूक पुढील तीन पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पालघर यांनी दिली आहे.जुना वरसावे पूल राहणार हलक्या वाहनांसाठी खुलामुंबई-अहमदाबाद या दोन शहरांना जोडणाºया महामार्गावरील वरसावे हा नवीन पूल महत्त्वाचा असून येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.त्यामुळे या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहतूकदारांकडून सतत होते. दरम्यान, या पुलाच्या दोन भागांना जोडणारे सांधे खराब झाले आहेत.डागडुजीसाठी तो जड-अवजड वाहनांसाठी महिनाभर बंद ठेवला जाणार असून यादरम्यान जुना पूल हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला राहणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले.विशेष वाहनांना परवानगीवाहतूक नियंत्रण अधिसूचना महसूल विभागाची वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने, तालुका दंडाधिकारी व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सुरत यांनी परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.हे आहेत पर्यायी तीन मार्गअहमदाबादकडून ठाणे, मुंबईकडे येणारी जड-अवजड वाहने मनोर-वाडा-भिवंडी-ठाणे येथून इच्छुकस्थळी जातील.विरार बाजूकडून ठाणे, मुंबईकडे येणारी जड-अवजड वाहने शिरसाटफाटा-गणेशपुरी-वज्रेश्वरी अंबाडी-भिवंडी-ठाणे येथून इच्छुकस्थळी जातील.वसई-विरार महानगरपालिका हद्दीतून जाणारी जड-अवजड वाहने ही चिंचोटी-कामण-अंजूरफाटा-भिवंडी-ठाणे येथून इच्छुकस्थळी जातील.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार