शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कर वसुली करण्याकरिता नवीन उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:24 IST

विरार वसई महानगरपालिकेने कर वसुलीची मोहीम हाती घेतली असून महापालिकेने कर न भरणाऱ्यांची नावे फलकावर लिहून ते फलक रस्त्याच्या मध्यभागी लावले आहे.

विरार : विरार वसई महानगरपालिकेने कर वसुलीची मोहीम हाती घेतली असून महापालिकेने कर न भरणाऱ्यांची नावे फलकावर लिहून ते फलक रस्त्याच्या मध्यभागी लावले आहे. तसेच थकबाकी न भरल्यास पाणी पुरवठा खंडित केला जाईल असा इशारा देखील पालिकेने दिला आहे.महापालिकेने नागरिकांना गेल्या अनेक वर्षात बºयाच सुविधा पुरवल्या आहेत तर या बदल्यात योग्य ती रक्कम कर म्हणून नागरिकांकडून घेतली आहे. पण काही नागरिकांनी अजूनही नियमित कर भरलेला नाही. अशा नागरिकांकडून कर वसूली करण्याकरीता शक्य असेल ती मोहीम महापालिका राबवत आहे. करांची उर्वरीत रक्कम नागरिकांकडून वसूल करण्याकरिता महापालिका शक्य असलेले सर्व प्रयत्न करत आहेत.२०१८-१९ मध्ये ९४७ जप्ती वसुली झालेल्या आहेत. २०१६-१७ मध्ये १२७ कोटींचा कर वसूल करण्यात आला तर २०१७-१८ मध्ये १६५ कोटींची कर वसूली झाली होती. यावर्षी महापालिकेने १८० कोटींचा आकडा पार केलेला आहे व ३०० कोटींचे उद्दीष्ट ठेवलेले आहे. आता पर्यंत कर वसुली करण्याबाबत व त्या बद्दल लोकांची मानसिकता बदलावी यासाठी महापालिका अधिकाºयांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली, बाईक रॅली देखील काढली होती. सर्व प्रयत्न झाले तरी ज्याची जास्तच कर रक्कम बाकी आहे, अशा नागरिकांची नावे फलकावर लिहिण्यात आली आहेत. तसेच आचोळे, पेल्हार, चंदनसार, अर्नाळा, नवघर, माणिकपूर, वसई, बोळींज, वालीव या ९ प्रभागसमिती मधील थकबाकी असलेल्या नागरिकांची नावे फलकावर लिहून ते मुख्य रस्त्यावर देखील लावण्यात आले आहे. तर काही ठिकाणी कायदेशीर कारवाई करीत असताना शेवटचा टप्पा हा पाणी पुरवठा खंडित करण्याचा असतो तर महापालिकेने हे पाऊल देखील उचलले आहे. आतापर्यंत पालिकेने २०० नळ जोडण्या तोडल्या आहेत. ज्या नागरिकांची सर्वात जास्त कर थकबाकी आहे किंवा ज्यांना थोडीही मुदत दिली जाऊ शकत नाही अशा नागरिकांवर महापालिका अशा प्रकारे कारवाई करीत आहे.याचप्रमाणे महापालिका कर्मचारी मोठ मोठ्या इमारतींखाली टेबल लावून बसतात जेणे करून नागरिकांना महापालिकेत जावे लागणार नाही. नागरिकांनी या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. ज्यांना कर कुठे भरायचे हे माहित नाही किंवा कर कोणाकडे जमा करायचे हे माहित नाही त्यांच्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. तसेच शनिवार, रविवार देखील मालमत्ता कर विभाग सुरु ठेवण्यात आला आहे. नोकरी करणाºया नागरिकांना रविवारी सुट्टी असते, अशा नागरिकांसाठी देखील पालिकने उपाय योजना केली आहे.कर वसूल करण्याकरिता जे लागेल ते कायदेशीर प्रयत्न पालिकेकडून केले जात आहेत. नागरिकांनी लवकरात लवकर या प्रयत्नांना प्रतिसाद देऊन उर्वरीत थकबाकी भरावी असे आवाहन महापालिका मालमत्ता कर विभागा कडून केली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत.आम्ही जे काही उपक्र म राबवत आहोत ते सगळे कायदेशीर आहेत आणि जे नवीन उपक्रम सुरु केले आहेत त्यांना देखील नागरिक प्रतिसाद देत आहेत. नागरिक इतर सर्व गोष्टींचे पैसे लगेच भरतात पण महापालिके कडे दुर्लक्ष करतात त्यामुळे नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. - संजय हेरवाडे, मनपा उपआयुक्त

टॅग्स :Vasai Virarवसई विरार