शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ना अपघाताची भीती ना दंडाची; दुचाकी चालविताना मोबाइलवर बोलणारे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:15 IST

वर्षभरात ३८४९ वाहनचालकांवर कारवाई : ६ लाख ६७ हजारांचा दंड वसूल

सुनील घरत लाेकमत न्यूज नेटवर्कपारोळ : मोबाइल ही आज जीवनावश्यक बाब बनली असून ज्याच्याकडे मोबाइल नाही असा माणूस मिळणे दुर्मीळ बनले आहे. दुसरीकडे आज दुचाकी चालवताना मोबाइलवर बोलणे ही एक फॅशन झाली आहे. या जीवघेण्या फॅशनचे अनुकरण दुचाकी चालवताना अनेक जण करत आहेत. ना त्यांना अपघाताची भीती, ना दंडाची, ना कुटुंबाची, अनेकदा ट्रक चालवणारेसुद्धा एका हातात मोबाइल व एका हाताने वाहन चालवतात. त्यामुळे नाहक निरपराध नागरिकांचा बळी जाण्याचा धोकाही वाढला आहे.दरम्यान, वर्षभरात गाडी चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांवर वाहतूक विभागाने मोठी कारवाई  केली असून त्यांच्याकडून दंडही वसूल केला आहे.   वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे हे धोक्याचे असते. यामुळे अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याच्या घटना वाढत आहेत. वसई, विरार, नालासोपारा परिसरात अनेक वाहनचालकांना वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना वाहतूक पोलिसांनी पकडले. त्यात ३ हजार ८४९ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.  वाहन चालविताना मोबाइलवर बोलल्यास अपघात होण्याची शक्यता असते. हे वाहनचालकांना माहिती असतानाही वाहनचालक वाहने चालवताना हा नियम मोडतात. मोबाइल आजघडीला अत्यावश्यक वस्तू बनली असली तरी काही ठिकाणी मोबाइलचा वापर करणे टाळावे. परंतु जीवाची पर्वा न करता मोबाइलवर सतत लागून राहणे हे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जानेवारी ते डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. 

वाहनचालकांची बेफिकिरीवाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या ३ हजार ८४९ वाहनचालकांना पकडून त्यांच्याकडून ७ लाख ६७ हजारांचा दंड वसूल केला गेला आहे. मोबाइलवर बोलत असताना वाहन चालवू नये किंवा वाहन चालवताना कुणाचा फोन आला तरीही तो फोन उचलू नये, असे वाहतूक नियम आहेत. मात्र वाहनचालक नियम मोडून आपल्याच धुंदीत वाहन चालवतात. 

प्रवास करीत असताना मोबाइलवर बोलताना आढळल्यास संबंधित वाहनचालकांकडून प्रत्येकी २०० रुपये दंड घेतला जात आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येते. वाहन चालवताना मोबाइलवर बोलण्यास बंदी असल्याने अशा वाहनचालकांवर कारवाई करून दंड वसूल केला जातो. ही कारवाई सतत सुरूच असते.- विलास सुपे, वाहतूक पोलीस अधिकारी