शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या घातक खांबांकडे पालघर पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 02:44 IST

पालघर-माहीम बायपास मार्गावर धोकादायक अवस्थेत असलेले विजेचे खांब हलविण्यात नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनांसाठी जीवघेणे ठरणारे हे खांब तात्काळ हटविण्याची मागणी भाजयुमोचे अध्यक्ष समीर पाटील यांनी केली आहे.

- हितेन नाईक पालघर : पालघर-माहीम बायपास मार्गावर धोकादायक अवस्थेत असलेले विजेचे खांब हलविण्यात नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनांसाठी जीवघेणे ठरणारे हे खांब तात्काळ हटविण्याची मागणी भाजयुमोचे अध्यक्ष समीर पाटील यांनी केली आहे.पालघर माहीम रोड वरील वळण नाका, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते चार रस्ता या रस्त्याचे चौपदीकरण झाल्यानंतर पालघर नगरपरिषदेने आपल्या स्वत:च्या मालकीचे स्ट्रीट लाईट या रस्त्यावर उभारले. त्यामुळे महावितरणचे असलेले व सध्या निकामी ठरलेले ३२ खांब तात्काळ हटविणे गरजेचे असतांना वर्षभरापासून हे धोकादायक खांब अजूनही उभे आहेत. नगरपरिषदेने हे खांब बाजूला सारून नंतरच ठेकेदाराकडून रस्त्याच्या चौपदीकरणाचे काम करून घेणे गरजेचे असताना पालिकेच्या निष्काळजीपणामुळे आजही हे खांब उभे आहेत. या खांबांचा अंदाज चालकांना येत नसल्याने छोटेमोठे अपघात घडले आहेत.>वापर नाही तरीही धोकादायक स्थितीत उभेया विद्युत खांबांची उभारणी जरी महावितरणने केली असली तरी त्यावर मालकी नगर परिषदेची आहे. त्यामुळे तिने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ पावले उचलून हे धोकादायक खांब तात्काळ हटविणे गरजेचे आहे. त्यांनी हे खांब हटविण्याचे शुल्क महावितरणकडे जमा केल्यास तात्काळ हे खांब हलविण्यात येतील असे एका महावितरणच्या अधिकाऱ्याने लोकमतशी बोलतांना सांगितले.धोकादायक असलेले हे खांब बदलण्याबाबत मागील पाच महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहोत. मात्र नगरपालिका आणि महावितरण याकडे दुर्लक्ष करीत आहे.- समीर वर्तक, भाजयुमो अध्यक्ष