शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनेक वनराई बंधा-यांची गरज, विक्रमगड तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 02:37 IST

विक्रमगड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेस विक्रमगड तालुक्यात चांगला प्रतिसाद असून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने विक्रमगड पंचायत समितीतर्फे प्रस्तावानुसार वनराई बंधा-यांची कामे हाती घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर(शिवा) सांबरे यांनी केली आहे़

विक्रमगड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेस विक्रमगड तालुक्यात चांगला प्रतिसाद असून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने विक्रमगड पंचायत समितीतर्फे प्रस्तावानुसार वनराई बंधा-यांची कामे हाती घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर(शिवा) सांबरे यांनी केली आहे़भात शेती हंगाम हा संपला असल्याने आता मजुरांच्या हाताला काम नाही व त्यांचे इतर शहराच्या ठिकाणी कामासाठी स्थलांतर होण्यापूर्वी त्यांना स्थानिक पातळीवर काम देणे गरजेचे आहे़ तसेच सध्या पावसाचे पाणी ओहोळ, छोटी नदी, नाले, यामध्ये अद्यापही आहे. ते वाहून जाऊ नये त्याचा आणखी काही महिने उपयोग व्हावा यासाठी राजगार हमी योजनेतून वनराई बंधा-यांची कामे हाती घेणे आवश्यक आहे़गेल्या काही वर्षांपासून विक्रमगड तालुक्यातील वनराई बंधा-याची कामे मंदावली आहेत़ यंदा बंधा-यांची कामे कधी चालू करणार असा सवाल मजुराकडून विचारला जात आहे़ कारण पाण्याचे साठे कमी झाल्यावर बंधारे बांधून उपयोग काय? इतर तालुक्यात वनराई बंधाºयांची कामे कधीच सुरू झाली आहेत.विक्रमगड तालुक्यात रोजगार हमी योजनेेंतर्गत गेल्यावर्षीच्या नोंदणीनुसार ६७ हजार मजुर कुंटुंबाची नोंदणी करण्यांत आली आहे़ तर त्यांना शंभरटक्के जॉबकार्ड देण्यांत आले आहेत तर त्याप्रमाणे लाभार्थ्यांची खातीही उघडण्यांत आली आहेत़पर्जन्याचे प्रमाण कमी झाल्याने दिवसेंदिवस भूजल पातळी कमी होऊन सर्वत्र पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चाललेली आहे़ त्यामुळे पडणाºया पावसाचे पाणी योग्य रितीने अडविल्यास त्याचा उपयोग शेतीसाठी, गुरांना पिण्यासाठी होईलच, परंतु भूजलाची पातळी ही वाढून पाणी टंचाईवर मात करता येईल़ यामुळे पंचायत समितीकडून ग्रामपंचायत हद्दीतील प्रस्ताव मागवून ओहोळ, छोटी नदी, नाले यावर वनराई बंधाºयांची कामे हाती घेतली जावी अशी मागणी आहे़>वनराई बंधाºयांचे असंख्य फायदेरोजगार हमी योजनेतून मजुरांना स्थानिक पातळीवरच कामे उपलब्ध होतात़ भुजल पातळी वाढवुन पाणी टंचाईच्या समस्या कमी होण्यास मदत होते, या पाण्यातून शेतक-यांना हंगामी भाजीपाला लागवडीसाठी उपयोग होतो. गुरांना पिण्याच्या पाण्याची सोंय होते़कसे तयार होतांत वनराई बंधारेयासाठी सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांची आवश्यकता असते, या रिकाम्या गोण्यांमध्ये रेती व माती भरुन हे वनराई बंधारे बांधले जातात़ त्यामुळे या वनराई बंधा-यांवर रोजगार हमीतून मजुरांना स्थानिक पातळीवरच रोजगाराची संधी उपलब्ध होत असते़ तसेच त्यांच्या बांधकामावर होणारा खर्चही अत्यंत अल्प असतो. त्यामुळे ते कितीही मोठ्या संख्येने बांधता येतात.