शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वसई मनपात १६०० पदांची गरज

By admin | Updated: November 18, 2015 00:11 IST

महानगरपालिकेने कर्मचारी भरतीसंदर्भातील बिंदुनियमावली शासनाकडे पाठवली असून अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर

वसई : महानगरपालिकेने कर्मचारी भरतीसंदर्भातील बिंदुनियमावली शासनाकडे पाठवली असून अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम जाणवू लागला आहे. अनेक विभागाची कामे ठेकेदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात येत आहेत. ही कामे वेळेवर होत नसल्यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत.महानगरपालिकेमध्ये गेली ६ वर्षे हजारो कर्मचारी ठेक्यावर काम करीत आहेत. महानगरपालिका निर्मितीच्या वेळी ज्या ग्रामपंचायतींना महानगरपालिकेत सामावून घेण्यात आले. त्या ग्रामपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना महानगरपालिका सेवेत घेण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा अनुभव तर दुसरीकडे ठेक्यावरील कामगारांना शून्य अनुभव अशा परिस्थितीमध्ये मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेली ६ वर्षे महानगरपालिकेचे प्रशासन चालवले. त्याचा काही प्रमाणात विकासकामांवर परिणामही जाणवला. यासंदर्भात महानगरपालिकेने राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठवला असून १६०० पदे त्वरीत भरणे आवश्यक आहे. परंतु राज्यशासनाच्या नगरविकास विभागाकडून याकामी सतत दिरंगाई होत आहे. सध्या महानगरपालिकेचे कामकाज विस्कळीत झाले असून विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले लवकर निघतात परंतु इतर कंपन्यांची बिले मात्र आठ ते नऊ महिने रखडली आहेत. त्यापैकी अनेक बिले हरवल्याचे सांगण्यात येते. महानगरपालिकेचे कामकाज सुचारू पद्धतीने होण्याकरीता महत्वाची पदे त्वरीत भरणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)