शहरं
Join us  
Trending Stories
1
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
2
"काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
3
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
4
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
5
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
6
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
7
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
8
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
9
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
10
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
11
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
12
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
13
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
14
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
15
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
16
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
17
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
18
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
19
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
20
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला

वसईतील अनधिकृत इमारतींना नळजोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 5:47 AM

महापालिकेचा ठराव : ग्रामीण भागालाही केला जाणार पाणीपुरवठा

वसई : महानगरपालिकेच्या विरार येथे बुधवारी झालेल्या महासभेत शहरातील अनधिकृत इमारतीनाही नळजोडण्या देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर वसईतील ग्रामीण भागातील नऊ वर्षापूर्वी टाकलेल्या जलवाहिन्यांची दुरूस्ती करून किंवा नवीन जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो इमारतीमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर ग्रामीण भागात पालिकेचे पाणी येणार म्हणून आनंदाचे वातावरण आहे.

वाढती लोकसंख्या लोकांची घराची गरज ओळखून शहरात अनेक विकासकांनी हजारो अनधिकृत इमारती बांधल्या. अनेक बनावट बांधकाम परवानग्या वापरून, आरक्षित जागेवर अतिक्रमण करून बांधकामे झाली. खोटी कागदपत्रे दाखवून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करून विकासक पळून जातात. महानगरपालिकेने शेकडो बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. परंतु त्यांनी यापूर्वीच फ्लॅट विकल्याने लोक या इमारतीत राहायला आले आहेत. त्यांच्यापुढे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता.अनधिकृत इमारतींपैकी काहीना घरपट्टी लावण्यात आलेली आहे. मात्र नळजोडण्या नाहीत. या इमारतीच्या रहिवाशांची नावे मतदार यादीत आहेत. परंतु त्यांना पाणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.

महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेत अखेर नळजोडण्या देण्याचा विषय चर्चिण्यात आला होता. अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना शास्ती न लावता प्रचलित दराने नळजोडण्या देण्यात याव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच दंड न आकारता नळजोडणी देण्याची मागणी केली. जेष्ठ नगरसेवकांनी या प्रस्तावाचे समर्थन करतांना अनधिकृत इमारतीत राहणाºया नागरिकांना नळजोडणी मिळावी, असे सांगितले. याचबरोबर आता पश्चिम पट्टयÞातील गावांनाही येत्या काळात पाणी मिळणार आहे. शहरात वितरणाचे काम सुरू आहे. नऊ वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने टाकलेल्या जलवाहिन्या गंजल्या आहेत. त्या दुरूस्त करून अथवा नवीन जलवाहिन्या टाकून पाणी गावकºयांना द्यावे असे जेष्ठ नगरसेवक प्रफुल्ल साने व नगरसेवक मार्शल लोपीस यांनी महासभेत सांगीतल्यावर त्या जलवाहिन्या दुरुस्त होतील, असे शहर अभियंता जवादे यांनी स्पष्ट केले.हा निर्णय कशामुळे घेण्यात आला?सूर्याचे १०० दशलक्ष लीटर पाणी आले आहे. सध्या प्रतिक्षा यादीतील अधिकृत आणि भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या इमारतींनाच नवीन नळजोडण्या देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत इमारतीत राहणाºया नागरिकाना टँकरच्या पाण्यावरच अलवंबून राहावे लागत होते. आता सूर्याच्या पाण्याच्या वितरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या अनधिकृत इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांनाही पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात येत होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईVasai Virarवसई विरार