शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

वाडा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा

By admin | Updated: October 11, 2016 02:42 IST

वाडा पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या सभापतीपदाची निवडणूक सोमवारी घेण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या

वाडा : वाडा पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या सभापतीपदाची निवडणूक सोमवारी घेण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मृणाली मोतीराम नडगे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. या निवडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपाने जल्लोषात स्वागत केले. वाडा पंचायत समितीची सदस्य संख्या १२ असून त्यापैकी सत्ताधारी भाजपाचे सहा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक तर शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. भाजपाने शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी समजोता केला आहे. त्यावेळी ठरलेल्या धोरणानुसार सभापतीपद पहिली दीड वर्ष भाजपाला आणि उर्वरित एक राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्याचे ठरले होते. त्यानुसार भाजपाचे अरूण गौंड यांचा दीड वर्षाचा कालावधी संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. सोमवारी वाडा पंचायत समितीच्या सभागृहात सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपा यांच्या कडून मृणाली नडगे यांचा तर शिवसेने कडून नरेश काळे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र नरेश काळे यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने नडगे या बिनविरोध निवडून आल्या. मृणाली नडगे यांचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, आमदार पांडुरंग बरोरा, भाजपाचे नेते बाबाजी काठोले, उपसभापती नंदकुमार पाटील, भाजपचे वाडा तालुकाध्यक्ष संदिप पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष पांडुरंग पठारे, ज्येष्ठ नेते हरिभाऊ पाटील, अशोक गव्हाळे, हरिश्चद्र पाटील, सुरेश पवार यांनी अभिनंदन केले आहे. पीठासीन अधिकारी म्हणून मोहन नळंदकर यांनी काम पाहिले. (वार्ताहर)