शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

तर नायगाव पूलाचे उदघाटन रोखू, जूचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:46 IST

जूचंद्र परिसरात उड्डाणपुल बांधण्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत पुलाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा जूचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेने दिला आहे.

वसई : नायगावला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा मार्ग डिसेंबर २०१८ पर्यंत मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली असतांना दुसरीकडे जूचंद्र स्थानकातील वाढती रेल्वे वाहतूक आणि त्याठिकाणी निर्माण झालेली वाहतूकीची कोंडी लक्षात घेता जोपर्यंत रेल्वेरूळावर जूचंद्र परिसरात उड्डाणपुल बांधण्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत पुलाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा जूचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेने दिला आहे.नायगाव उड्डाणपुलाचा उद्घाटनाचा मुहूर्त डिसेंबर महिन्याचा असला तरी पुलाचे काम मार्गी लागण्या बरोबरच जूचंद्र परिसरातील रेल्वे रूळांवरील उड्डाणपुलाचा प्रश्न हि तितक्याच जोमाने मार्गी लागावा यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.दरम्यान नायगाव पूर्व-पश्चिम जोडणाºया पुलाचे काम सध्या अंितम टप्प्यात असून माहे डिसेंबर २०१८ पर्यंत पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला होण्याचे संकेत नुकतेच एमएमआरडीएकडून मिळाले. तत्पूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला तर प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागण्याची भीती ग्रामस्थांना आहे.जूचंद्र रेल्वे स्थानकात वाढत्या रेल्वे वाहतूकीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा तर होणार मात्र हि समस्या लक्षात घेता जूचंद्र रेल्वे फाटक उड्डाणपूलाला मंजूरी मिळाली असली तरी अजून प्रत्यक्ष कामास सुरूवात झालेली नाही.परिणामी नायगाव पुलाच्या उद्घाटनाला तूर्तास जूचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेने विरोध केला असून जोपर्यंत जूचंद्र येथील वाढत्या वाहतुककोंडीवर प्रशासन योग्यरित्या उपाययोजना करत नाही तोपर्यंत उड्डाणपुलाचा मुहूर्त कार्यक्रम भविष्यात होऊ देणार नसल्याचा गंभीर इशारा रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिला..जूचंद्र रेल्वे रुळावरचे प्रस्तावित काम मार्गी लावा !जूचंद्र स्थित बापाणे ते नायगाव असा मुख्य रस्ता असून वसई-दिवा लोहमार्ग येथूनच गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे फाटक बसवण्यात आले आहेत. ज्यावेळी रेल्वेगाडी येते, तेव्हा हे फाटक बंद होते, त्यावेळी मोठी वाहतुककोंडी होते.साधारण दिवसातून ३० ते ४० वेळा हे फाटक बंद होते.या परिस्थितीत जर नायगाव पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले तर त्याचा फटका वाहनचालक आणि नागरिकांना बसेल, त्यामुळे एमएमआरडीए प्रशासनाने आधी फाटकाजवळ उड्डाणपुलाचे प्रस्तावित काम पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याची मागणी संघटनेने केली आहे.