शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कामांचे स्वरुप गुंतागुंतीचे, एकाच वेळी तीन आघाड्यांवर झुंज सुरु

By admin | Updated: July 6, 2016 02:27 IST

पश्चिम रेल्वे मार्गावरील डहाणू रोड रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी मालगाडीचे अकरा डबे घसरल्याने अपघातग्रस्त झालेल्या पश्चिम रेल्वेला पूर्ववत करण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत.

- शौकत शैख,  डहाणू

पश्चिम रेल्वे मार्गावरील डहाणू रोड रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी मालगाडीचे अकरा डबे घसरल्याने अपघातग्रस्त झालेल्या पश्चिम रेल्वेला पूर्ववत करण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत. वादळीवारे, पाऊस याच्याशी सामना करीत लोहमार्ग पूर्ववत करणे ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणा अशा तीन आघाड्यांवर सहाशे कर्मचारी, तंत्रज्ञ, अभियंते अहोरात्र काम करीत आहेत. सोमवारी दुपारी २.४० वाजल्यापासून तीन नंबर लाइन मोकळी करण्यात आली व तिच्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी ,आॅगस्ट क्रांती, राजधानी, दुरान्तो ,अवंतिका अशा मेल, एक्स्प्रेस गाडया पाठविण्यात आल्या तर उखडलेली रेल्वेलाइन पूर्ववत करण्याच्या दृष्टीने तुटलेले स्लीपर बसवून त्यावर रूळ बसविणे, तुटलेली ओव्हरेड वायर नव्याने बसविणे, शिवाय उखडून गेलेली सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी केबिन टाकणे हि कामे रेल्वेचे सहाशे कर्मचारी, तंत्रज्ञ रात्रभर करत होते. त्यासाठी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल, विभागीय रेल व्यवस्थापक मुकुल जैन सर्व कामावर देखरेख करण्यासाठी तळ ठोकून आहेत. मुंबई कडे जाणाऱ्या एका लाईन वरुन सकाळी जाणाऱ्या फ्लार्इंग रानी, सयाजी नगरी , इंदूर ,बिकानेर या गाड्याना विरारपर्यन्त सर्व स्थानकांवर थांबा देण्यात आला तर गुजरातकडे जाणाऱ्या सौराष्ट्र एक्स्प्रेस, वापी पॅसेंजर ,सूरत शटल या गाडया रद्द करण्यात आल्या मात्र बिकानेर, इंदूर , अवध एक्स्प्रेस या गाडया एक नंबर फलाटावरून गुजरातकडे रवाना करण्यात आल्या. लोकल सेवा बोईसर रेल्वे स्थानकापर्यंत सुरू आहे. तीे पूर्ववत होण्यासाठी अद्यापही एक दोन दिवसाचा अवधी लागण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त मालगाडीचे काही डबे घोलवड रेल्वेस्थानकात तर काही खांजणात ठेवण्यात आले आहेत.