शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गप्रेमींनी केली दाबोसा धबधब्याची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:22 IST

पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी तरुणाईने येथील प्रख्यात अशा दाबोसा धबधब्याच्या परिसराची साफसफाई करून तो चकाचक केला.  त्यांच्या या उपक्रमाचे पर्यटकांनी कौतुक केले आहे. 

जव्हार : पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी तरुणाईने येथील प्रख्यात अशा दाबोसा धबधब्याच्या परिसराची साफसफाई करून तो चकाचक केला.  त्यांच्या या उपक्रमाचे पर्यटकांनी कौतुक केले आहे. पावसाळा सुरु  झाला की, पर्यटकांना पडते. नैसर्गिक धबधब्यांची भुरळ. अशाच धबधब्यांपैकी तालुक्यातील निसर्गरम्य दाबोसा धबधबा आहे. त्यामुळे या धबधब्यावर  रोज शेकडो पर्यटक येत आहेत. मात्र या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्याबाबत पर्यटकांकडून नाराजीचा सूर निघत होता. त्यामुळे जव्हार शहरातील निसर्गप्रेमी, सर्प व प्राणी मित्र यांनी तिथे  जाऊन शुक्रवारी संपूर्ण परिसराची स्वच्छता केली.  पालघर जिल्ह्यातील  जव्हार तालुक्यातील निसर्गरम्य असलेला दाबोसा धबधबा पावसाळा सुरु  झाला की, पर्यटकांना भुरळ घालतो.  मात्रा  या धबधब्याच्या पायथ्याशी प्लास्टिक च्या पिशव्या, बियर, व्हिस्कीच्या, काचेच्या बाटल्या, कागदाचे तुकडे,  पाणी बॉटल,  अशी घाण सर्वत्र पसरली होती. त्यामुळे पर्यटकांना एवढ्या सुंदर पर्यटनस्थळी घाणीचे साम्राज्य पसरल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत होते. निसर्गप्रेमी, सर्प व प्राणी मित्र यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी शुक्र वारी या परिसराची स्वच्छता करून कच-याची विल्हेवाटही  लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक,  गुजरात, दादारनगर हवेली, या ठिकाणाहून रोज शेकडो पर्यटक येथे  येत असतात.  त्यामुळे  या पुढे तरी हा परिसर स्वच्छ रहावा यासाठी या परिसरात घाण, कचरा न करता, प्लॅस्टिक पिशव्या, बियर  बॉटल, असा वस्तू कचरा पेटीत टाका असे आवाहन निसर्गप्रेमींनी केले आहे.  तसेचवन्य विभागने या पर्यटनस्थळाच्या स्वच्छतेसाठी दोन कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त  करावेत व  पर्यटनस्थळाचा परिसर स्वच्छ ठेवावा अशी मागणी  येथे येणारे पर्यटक आणि निसर्गप्रेमी हे  सातत्याने करीत  आहेत.