शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक नाले संकटात; वसई पुन्हा बुडणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 01:06 IST

लाखो ब्रास मातीचे सपाटीकरण करून नैसर्गिक नाले बुजवले

वसई : वसईत अनेक ठिकाणी सपाटीकरणाच्या नावाखाली बेकायदा माती भराव करून चक्क नैसर्गिक नालेच बुजविले जात असून पुन्हा दुसऱ्यांदा यंदाच्या पावसाळ्यात वसई सहित पापडी व कौल सिटी पाण्याखाली येणार असून शहरातील नागरिकांच्या असंख्य तक्र ारी असताना देखील वसई -विरार महापालिका व वसईचे महसूल खात्याने मात्र अद्याप झोपेचे सोंग घेतले आहे.वसईच्या पापडी रोड वर बिगबाजार मॉलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जमीनीवर केवळ सपाटीकरणाचा अर्ज दाखल करून केवळ अर्ज हीच परवानगी मानून अज्ञात इसमांनी लाखो ब्रास मातीभराव केला आहे, तर दुसरीकडे कौल सिटी मध्येही सांडोर -चुळणे हा भला मोठा नाला मातीभराव करून बुजवला आहे.वसई पापडी व कौल सिटी मधील दोन्ही नाले हे नैसर्गिक असून राजकीय दबाव वापरून कोणीतरी अज्ञात इसमाने हे सांडोर ते उमेलमान आणि सांडोर ते चूळणे गाव जाणारे दोन्ही नैसर्गिक नालेच बुजवले असून याठिकाणी पाणी जाण्याचा मार्ग बंद केला आहे. दरम्यान, भाबोला- पापडी आणि कौल सिटीत भर रस्त्यावर दिवसाढवळ्या असे नाले बुजविणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. परंतु पालिकेच्या शहर अभियंता विभागाने आणि वसई तहसीलदार कार्यालयाने याची गंभीर दखल घेतलेली नाही.एकूणच पालिकेच्या ‘आय’ व ‘एच’ प्रभागात सुरु असलेल्या या गंभीर बाबींचा सर्वाधिक फटका पुन्हा एकदा वसई- पापडी व चुळणेवासियांना येत्या पावसाळयात अनुभवायला मिळणार आहे. मुळातच नैसिर्गक नाले बुजवणे आणि वसईतील सपाटीकरण, मातीभराव थांबवले नाही.अधिकाऱ्यांचा पवित्राही कोड्यात टाकणारामाती भराव करुन नैसिर्गक नाले पूर्ववत करण्याचा गोरख धंदा सध्या वसईमध्ये सुरु असून याबाबत महसूल व महापालिका यांच्या कडे तक्र ार केल्यावर तलाठी, सर्कल आणि अभियंते यांनी आपले हात चक्क वर करून वरीष्ठांना विचारल्याशिवाय काहीही कारवाई करू शकत नाही असा पावित्रा घेतला आहेआम्ही मंडळ अधिकारी माणिकपूर वसावे यांना नाले बुजवले असतील तर त्या घटनास्थळी पाठवले असून ते पाहणी करून अहवाल दिल्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू!- किरण सुरवसे, तहसीलदार (वसई)वसई - पापडी रस्त्यावर बिगबाजाराच्या बाजूला जमिनीवर मातीभराव झाला आहे. मात्र, जमीनमालकाने केवळ सपाटीकरणासाठी परवानगी मिळावी असा अर्ज तहसीलमध्ये केला असून त्याला अद्याप परवानगी दिलेली नाही.दिनेश पाटील, तलाठी (सांडोर)शहरातील नैसर्गिक नाले बुजवले जात असतील तर ते काम सध्या महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड पहात असून त्यांना याबाबत तशा सूचना देतो, त्यावर उचित कारवाई करू !-माधव जवादे ,शहर अभियंता, वसई विरार महापालिका