शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चार नगरसेवकांवर राष्ट्रवादी करणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:05 IST

त्या चार नगरसेवकांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

डहाणू/बोर्डी : भाजपमध्ये प्रवेश करून पक्षविरोधी भूमिका घेतल्याप्रकरणी डहाणू नगरपरिषदेतील नगरसेवक मिहीर शहा, राजेंद्र माच्छी, शमी पिरा आणि भावेश देसाई यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लवकरच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तर या प्रवेशावेळी आमदार आनंद ठाकूर यांचे पुत्र करण हे उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विखे पॅटर्नची चर्चा रंगली आहे.पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी पक्षातील डहाणू नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान स्वीकृत सदस्य मिहीर शहा आणि अन्य तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य आनंद ठाकूर यांचे पुत्र करण हेही तेथे उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्यांची खेळी विखें पिता-पुत्रांप्रमाणे असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुजय आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजप प्रवेश केला होता.दरम्यान, डहाणू नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहा भाजपमध्ये गेले होते. त्यावेळी निवडणुकीच्या काही दिवसआधी त्यांची मनधरणी करून घरवापसी करण्यात राष्ट्रवादीला यश आले होते. त्यानंतर ‘सुबह का भूला, शाम को घर लौटे तो उसे भूला नही कहते’, अशी प्रतिक्रिया त्यावेळी आमदार ठाकूर यांनी दिली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मुलानेच भाजपची वाट धरल्यानंतर वडिलही त्याच मार्गावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर नगरसेवक तन्मय बारी यांची डहाणू शहर अध्यक्षपदी वर्णी लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बंडखोरांविरुद्ध दंड थोपटले आहेत.या नगरसेवकांच्या प्रवेशाबाबत पालकमंत्र्यांच्या फेसबूक पेज शिवाय अधिकृतपणे वाच्यता केली जात नसली तरी या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रवादीने घेतली असून चारही नगरसेवकांवर कारवाई करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.