वाडा : भिवंडी - वाडा-मनोर या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण असल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे अनेक अपघात होत असून काही जायबंदी तर काहींना आपले प्राण गमवावे लागत असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप श्रमजीवीने केला आहे. या पार्श्वभूमीवर या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेतर्फे येत्या सोमवारी ( दि. ३०) सा.बां. विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.वाडा-भिवंडी-मनोर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम शासनाने सुप्रीम कंपनीला दिले आहे. मात्र, पाच वर्षे उलटूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. ज्या ठिकाणी काम झाले ते निकृष्ट दर्जाचे झाल्याने जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी श्रमजीवी संघटनेने अनेक वेळा आंदोलने केली. मात्र, आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही. तसेच कुडूस नाक्यावर हातगाड्या व अतिक्रमणे हटविण्याबाबत तक्र ारी केल्या असता त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप श्रमजीवीने निवेदनात केला आहे. सुप्रीम कंपनीला बांधकाम विभागाने पाठीशी घालत असल्याचा निषेधार्थ हा उपरोधिक सत्कार कार्यक्रम होणार आहे.(वार्ताहर) ‘त्या’ अधिकऱ्यांना भरला दम आंदोलनस्थळी बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित न राहिल्यास याद राखा, असा सज्जड दमदेखील श्रमजीवी संघटनेने निवेदनात दिला आहे. या अनोख्या आंदोलनाने मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी धास्तावले आहेत.
कामचुकार, भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे चव्हाट्यावर येणार
By admin | Updated: May 28, 2016 02:29 IST