शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीच्या नावाखाली पालिकेच्या शिक्क्यानिशी लूट, अनधिकृत फेरीवाल्यांचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:35 IST

वसई-विरार महानगरपालिकेने नेमलेले बाजार ठेकेदार शहरातील फेरीवाल्यांकडून वस्तू-सेवा कराच्या (जीएसटी) नावाखाली सरळसरळ लूट करीत आहेत.

वसई : वसई-विरार महानगरपालिकेने नेमलेले बाजार ठेकेदार शहरातील फेरीवाल्यांकडून वस्तू-सेवा कराच्या (जीएसटी) नावाखाली सरळसरळ लूट करीत आहेत. महापालिकेच्या नावाचा आणि शिक्क्याचाही गैरवापर होत असून, या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.वसई-विरार शहरातील बाजारमाफियांनी शहरातील मोक्याच्या जागा हडप करून लूट चालवली असताना, आता अधिकृत बाजारातही मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वसई-विरार महानगरपालिकेचे फेरीवाला धोरण अद्याप मंजूर नाही. त्यामुळे शहरात अनिधकृत फेरीवाल्यांनी शहर गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. जागोजागी बेकायदा फेरीवाल्यांनी जागा अडवून बाजार मांडला आहे. मात्र अधिकृत बाजारातही गैरव्यवहार होत असल्याची बाब पुढे आली आहे. महापालिकेने १८ ठिकाणी अधिकृत फेरीवाल्यांना परवानगी दिली आहे. त्यांच्याकडून महापालिका ठेकेदारांमार्फत बाजार शुल्क वसूल करीत असते. मात्र ठेकेदार आता महापालिकेच्या नावाने बेकायदा वसुलीही केल्याचे समोर आले आहे.विरार पूर्व आणि नालासोपारा पश्चिम येथील ठेकेदार फेरीवाल्यांकडून २० ते ४० रु पये दररोज बाजार शुल्क घेतात. ठेकेदारांनी फेरीवाल्यांना दिलेल्या पावतीवर महापालिकेचे नाव आणि शिक्का असतो. धक्कादायक बाब म्हणजे, याच पावतीवर ५ रुपये वस्तू-सेवा कर आकारला जातो. वस्तू-सेवा कराच्या संकेतस्थळावर तपशील तपासला असता, हा वस्तू-सेवा क्रमांक अयोग्य असल्याचे दाखवले जात आहे. बनावट वस्तू सेवा कर क्रमांक दाखवून ही लूट केली जात असल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. दररोज हजारो फेरीवाल्यांकडून अवैध वसुली केली जात आहे. या माध्यमातून दररोज हजारो रुपयांची लूट होत असून हा लाखोंचा गैरव्यवहार असल्याचे समोर आले आहे. महानगरपालिकेने १८ ठिकाणी बाजार शुल्क वसुलीचा ठेका विविध ठेकेदारांना दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली. मात्र फेरीवाल्यांकडून वस्तू-सेवा कर वसूल करण्याची तरतूद नसल्याची माहिती त्यांनी दिली. हा नेमका काय प्रकार आहे त्याची माहिती घेऊन चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.नवघर पूर्व येथील फेरीवाल्याना हटवले, गाड्या जप्तजीएसटीच्या नावाखाली महानगरपालिका ठेकेदारांमार्फत बाजार शुल्क वसूल करीत असताना, नवघर पूर्व येथील फेरीवाल्यांवर गेल्या दोन दिवसांपासून पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई करत त्यांना हूसकावून लावले आहे. यात ८ ते १० फेरीवाल्यांचा माल व गाड्या पालिकेच्या कर्मचाºयांनी जप्त करून नेल्याचे आहेत. या ठिकाणीही पालिकेचे ठेकेदार प्रत्येक फेरीवाल्याकडून रोज हद्दीतील वसुली म्हणून १० रूपयांची पावती फाडत असतात.विशेष म्हणजे या पावतीवर जीएसटी लावला नसला तरी हद्दीतील वसुली कोणत्या क्षेत्रातील व वसुली करणारा कोण याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत चौकशी केली असता ज्या नवघर पूर्व येथील फेरीवाल्यांकडून पालिकेचे ठेकेदार रोज १० रूपयांची पावती फाडत आहेत, ती जागा ना रेल्वेची आहे ना महानगरपालिकेची. सदर जागा ही मिठागाराची असल्याचे समोर आले आहे. मात्र पालिका ठेकेदार हे सदर पावती स्वच्छतेबाबत घेत असल्याचे सांगण्यात आले.याबाबत गेली १५ वर्षे नवघर पूर्व येथे तेथे केळी विक्र ी करणाºया लक्ष्मीकांत मिश्रा यांनी सांगितले कि, या मिठागाराला लागून वनविभागाचीही जमीन आहे. प्रत्यक्षात महानगरपालिका येथील फेरिवाल्यांकडून स्वच्छता कर घेऊ शकत नाही. पालिकेचे ठेकेदार जी पावती हद्दीची वसूली करतात, ती हद्दच पालिकेची नाही. आता तर अचानक येथे गाड्या लावू नयेत म्हणून दमदाटी करत आहेत.अनधिकृत आठवडाबाजारांवर कारवाई नाहीशहरात जागोजागी अनधिकृत फेरीवाल्यांचे आठवडा बाजार भरवले जात आहेत. या अनधिकृत बाजारातून दररोज लाखो रुपयांचा हप्ता गोळा केला जात आहे. पूर्वी महापालिकेच्या फेरीवाला विभागातर्फेत्यांच्यावर नाममात्र कारवाई केली जात होती.आता हा विभागच बरखास्त करण्यात आला असून प्रत्येक प्रभागातील प्रभारी साहायक आयुक्तांना याबाबत कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने या अनधिकृत आठवडा बाजारांची संख्या वाढतच चालली आहे.

टॅग्स :GSTजीएसटीVasai Virarवसई विरार