शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपारा बोगस म्हणून कुविख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:11 IST

नव्याने प्राप्त झाली कलंकित ओळख : ब्लॅकमेल करून पैसे कमविण्याचा धंदा सुरु

नालासोपारा : वसई तालुक्यातील आणि सातासमुद्रापलिकडे गाजलेले शहर म्हणजे ‘नालासोपारा’ पण त्याला आता त्याची ‘बोगस’ या नावाने कुप्रसिद्धी होते आहे. नालासोपारा शहरात बोगस नावाने भरपूर काही कामकाज होत आहे. त्यातच बोगस डॉक्टर, बोगस पत्रकार, बोगस रिक्षा, बोगस शाळा, बोगस बिल्डर, बोगस संस्था, बोगस मेडिकल, बोगस मानवाधिकार संघटना, बोगस सीसी, जागेची बोगस कागदपत्रे, बोगस रेशनकार्ड, बोगस आधारकार्ड, बोगस इलेक्शन कार्ड अशा अनेक बोगस नावाने नालासोपारा शहराला ग्रासले आहे.

नालासोपारा शहरात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाला आहे. वसई पंचायत समितीने नालासोपारामधील बोगस शाळांची यादी दरवर्षी तयार करतात. पण ती यादी कमी होण्याऐवजी दरवर्षी वाढते. नालासोपारामध्ये वाढत चाललेली लोकसंख्या पाहता बनावट कागदपत्रे बनवून बोगस रिक्षांचा धंदा तर तेजीत सुरु असून वाहतूक विभाग यांच्यावर कारवाई करण्याऐवजी बिनधास्त डोळे बंद करून असल्याचे दिसत आहे. वसई विरार मनपाचा आरोग्य विभाग बोगस डॉक्टरची यादी तयार करतात पण या बोगस डॉक्टरांवरील कारवाईचे काय? नालासोपारा शहरातील दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये बोगस सीसी आणि जागेच्या बाबतीतील बोगस पत्र बनवल्याचे गुन्हे दाखल झालेत पण हे प्रकारही आता वाढतच आहेत.

बोगस कागदपत्रे बनवून त्याआधारे बोगस रेशनकार्ड, आधारकार्ड, इलेक्शन कार्ड बिनधास्त बनवले गेल्याचे दिसून येत आहे. पण तहसील प्रशासन याकडे का लक्ष घालत नाही? बोगस बनवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई का करत नाही. हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. नालासोपाºयात बनावट कागदपत्रांच्या आधारे काही इमारतीमधील घरांना बँकेतील काही अधिकारी बिल्डर आणि ग्राहकांकडून काही आर्थिक साटेलोटे करून बिनधास्त लोन पास केले आहे. पण ज्यांच्याकडे खरी कागदपत्रे आहेत त्यांचे लोन बँका त्यांना १० वेळा फेºया मारूनसुद्धा पास करत नाही. नालासोपाºयात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असल्यामुळे या ना त्या नावाने बोगस संस्था व मानवाधिकार संघटना काढून त्यांना ब्लॅकमेल करून पैसे कमविण्याचा धंदा सुरु आहे. प्राचीन महत्त्व असलेल्या नालासोपाºयाचे आता ‘बोगस’ नावापासून रक्षण करणे ही काळाची गरज आहे एवढे मात्र निश्चित!नालासोपारा शहराला प्राचीन महत्त्व आहे पण या बोगस नावाने खरोखर नालासोपारा शहराला कलंकित केले आहे. वेळीच यावर प्रशासनने लक्ष दिले नाही तर नालासोपारा याच नावाने कुविख्यात होईल.- राज दसोनी,माहिती अधिकार कार्यकर्ताबोगस या शब्दाने नालासोपारा शहराचे नाव का बदनाम झाले . कोणीही राजकारणी याकडे लक्ष देत नाही. जिथे आपण राहिलो, खेळलो, आज मोठे झालो, नावारूपाला आलो ते सगळे त्याकडे का दुर्लक्ष करतात. कुठे नेऊन ठेवला आमचा नालासोपारा.- आशिष कर्णिक, रहिवासी, नालासोपारा शहर