शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्याचा इकरार दुबईतून दोन वर्षे बेपत्ता

By admin | Updated: February 14, 2017 02:35 IST

दुबईत नोकरीसाठी गेलेला नालासोपारा येथील इकरार खान हा गेल्या दोन महिन्यांपासून गूढरित्या बेपत्ता झाला आहे. त्याच्या शोधासाठी त्याची

पारोळ: दुबईत नोकरीसाठी गेलेला नालासोपारा येथील इकरार खान हा गेल्या दोन महिन्यांपासून गूढरित्या बेपत्ता झाला आहे. त्याच्या शोधासाठी त्याची बहीण हाजरा शेख हिने जंगजंग पछाडले. परंतु अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही. तो उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रहात होता. तिने दिलेल्या माहितीनुसार तो २०११ मध्ये दुबईला गेला व २०१३ मध्ये तो परत आला. २०१४ मध्ये त्याने लग्न केलं. दीड महिना झाल्यावर तो पुन्हा दुबईतील सल्तनत ओमान या कंपनीत एसी टेक्निशियनची नोकरी करू लागला.तो सोशल मिडियाद्वारे तो बहिणीच्या नियमित संपर्कात होता. गेल्या २० डिसेंबरला तो तिथल्या इबरी मार्केट मध्ये गेला आणि घरच्यांना सांगितले कि मी तुम्हाला थोड्याच वेळात पैसे पाठवतो भारतीय वेळे नुसार तेव्हा दुपारचा दीड वाजला होता. त्यानंतर त्याचा फोन स्वीच्ड आॅफ झाला. तेव्हापासून त्याच्याशी संपर्क झालेला नाही. त्याच्या नातेवाईकांनी उत्तरप्रदेश मधून ,मस्कत, ओमानच्या दूतावासात ३ वेळा तक्रार केली तसेच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही पत्रव्यवहार केला मात्र त्यांना अद्याप कुठूनही उत्तर आले नाही २५ जानेवारी २०१७ ला इकरारच्या नातेवाईकांना पाकिस्तानी इसमाचा फोन आला की इकरार पाकिस्तानच्या तुरूंगात आहे. मात्र त्याने तो कोणत्या तुरूगांत आहे हे सांगितले नाही.तो अरबी भाषेत बोलल्याने इकरार नेमका कुठे आहे नेमकं काय झालं ते समजलं नाही. या नंतर कुटुंबियांची काळजी अधिकच वाढली आहे. त्याचे अपहरण झालं असण्याची शक्यता तिने व्यक्त केली आहे. ज्या कंपनीत इकरार काम करायचा त्यांनी देखील हात वर केले आहेत. याबाबत मी पंतप्रधानांना लक्ष घालून भावाला शोधण्याची विनंती केल्याचे हाजराने सांगितलं. तो येथे त्याची पत्नी अंजुम आणि आई वडिलांसह रहात होता. त्याला कुठलही वाईट संगत नव्हती तसेच तो कुठल्याही संघटनेशी संबंधित नव्हता असे त्याच्या बहिणीने सांगितले. (वार्ताहर)