शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीचे वाड्यात वाजू लागले पडघम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 05:40 IST

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन सुमारे पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे लवकरच तिच्या निवडणुका घोषीत होण्याची चिन्हे असल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

- वसंत भोईर वाडा : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन सुमारे पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे लवकरच तिच्या निवडणुका घोषीत होण्याची चिन्हे असल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.ग्रामपंचायत असतांना सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजप युतीमध्ये सध्या बेबनाव असून हे दोन्ही पक्ष स्वबळाच्ांीच भाषा करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्यावेळी कायम दुय्यम भूमिका घ्यावी लागलेल्या भारतीय जनता पार्टीचे गेल्या काही निवडणुकांतील मताधिक्य वाढल्याने ताकद वाढली आहे. त्यातच पंचायत समितीपासून केंद्रसरकारपर्यंत भाजपचीच सत्ता असल्याने आता भाजपकडे कार्यकर्त्यांचा भरणा वाढला आहे.नगरपंचायत निवडणुकीत अनुसूचित जमातीचे आरक्षण कमी झाल्याने इतर मागासवर्ग व खुल्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे अन्य समाजातील कार्यकर्त्यांना संधी वाढल्याने सर्वच राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांच्या आकांक्षा वाढल्या आहेत. शिवसेनेचे वाडा शहरावर आजवर कायम वर्चस्व सिध्द झाले आहे. मात्र यावेळी भाजपने जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करत आपला विस्तार केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत काळातील शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला नगरपंचायत निवडणुकीत उपयोगाचा नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष सध्यातरी स्वबळाची भाषा करताना दिसत आहेत. तसेच ग्रामपंचायतीत महत्वाची भूमिका बजावणाºया बहुजन विकास आघाडीनेही काही जागांवर आपले उमेदवार जाहीर करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही निवडणूकीच्या मोर्चेबांधणीला लागली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी गणेशोत्सवाचें निमित्त साधून आपापल्या प्रभागात निवडक मतदारांच्या भेटी घेण्यावर भर दिल्याने नगरपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याचे दिसत आहे.युती, आघाडीत बिघाडीशिवसेना आणि भाजपने जागानिहाय मोर्चेबांधणी केली आहे. राष्ट्रवादीने ही निवडणूक गांभीर्याने घेतली असून कॉंग्रेससोबत आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्येदेखील इच्छुक वाढले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षात जागा वाटपावरून बिनसण्याची चिन्हे आहेत.