शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोपा-यातील अपहृत व्यापा-याची हत्या, पडघा येथे आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 06:39 IST

नालासोपा-यातून अपहरण करण्यात आलेल्या नरेंद्र मिश्रा या व्यापाºयाचा मृतदेह भिवंडीजवळील पडघा गावानजिकच्या जंगलात पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात दोन संशयित बंधूंविरोधात गुन्हा दाखल असून ते फरार आहेत.

वसई -  नालासोपा-यातून अपहरण करण्यात आलेल्या नरेंद्र मिश्रा या व्यापाºयाचा मृतदेह भिवंडीजवळील पडघा गावानजिकच्या जंगलात पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात दोन संशयित बंधूंविरोधात गुन्हा दाखल असून ते फरार आहेत.त्यांचा मालाड येथे ड्रेस मटेरियल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी नालासोपारा येथे राहणाºया रोहित आणि पंकज सिंग यांना आठ लाख रुपयांचा माल दिला होता.मात्र, हे दोघेही पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. ४ मार्चला सकाळी रोहित सिंग यांनी नरेंद्र यांना नालासोपारा येथील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. तिथून रोहित नरेंद्र यांना आपल्या कारमधून घेऊ़न गेले होते. तेव्हापासून ते बेपत्ता असल्याची तक्रार त्यांची पत्नी दिप्ती यांनी केली होती. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रोहित सोबत नरेंद्र कारमधून गेल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पैशाच्या वादातूनच या बंधूंनी त्यांचे अपहरण केल्याची तक्रार दिप्ती यांनी दिल्यानंतर नालासोपारा पोलीस ठाण्यात दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी रात्री भिवंडी पोलीसांना पडघा येथे जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याची माहिती दिल्यावरून तुळींज पोलिस नरेंद्रच्या नातेवाईकांसह घटनास्थळी गेले होते. त्यावेळी पोलिसांनी मृत इसमाच्या अंगावरील कपडे आणि इतर साहित्य दाखविले असता तो नरेंद्रचा मृतदेह असल्याची ओळख नातेवाईकांनी पटवली होती. मृतदेह कुजलेला असल्याने पोलिसांनी दफन करून ठेवला आहे. त्यामुळे रविवारी संध्याकाळपर्यंत तो नातेवाईकांना देण्यात आलानव्हता.मारेकºयांना पोलिसांची छुपी साथ?दरम्यान, नरेंद्रचे अपहरण केल्याचा पुरावा पोलिसांना दिला होता. त्यांनी रोहितला दोन वेळा चौकशीच्या नावाखाली पोलीस ठाण्यात बोलावूनही घेतले होते. मात्र, त्याला अटक न करता सोडून देण्यात आल्याने दोन्ही भाऊ आता फरार झाले आहेत. जर तक्रार केल्या केल्या पोलिसांनी त्या दोघांची कसून चौकशी केली असती तर नरेंद्र यांचे प्राण वाचविता येऊ शकले असते. असेही दिप्ती मिश्रा यांनी पोलीस अधिक्षकांकडे केलेल्या तक्रारी म्हटले आहे..

टॅग्स :Murderखून