शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजा वापरण्यास महापालिकेने केला प्रतिबंध

By धीरज परब | Updated: January 12, 2024 18:51 IST

नायलॉन मांजाचा वापर केल्यास कारवाईचा इशारा पालिकेने दिला आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने मकर संक्रांति निमित्त नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व पतंग उडवण्याकरिता वापरण्यास प्रतिबंध घातला आहे. नायलॉन मांजाचा वापर केल्यास कारवाईचा इशारा पालिकेने दिला आहे. मकर संक्राती निमित्त पतंग उडवले जातात. पतंग उडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक किंवा सिंथेटिक धाग्यांचा किंवा नायलॉन मांजा वापर करण्याची शक्यता असते. नायलॉन मांजामुळे पक्षी यांना इजा होते तसेच अनेक पक्षी जीव गमावतात. नायलॉन मांजामुळे केवळ पक्षीच नाही तर मनुष्य यांना सुद्धा धोकादायक असून नायलॉन मांजामुळे माणसांना देखील इजा होऊन अगदी जीव गमवावा लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळेच शासनाने देखील नायलॉन मांजा वर बंदी घातलेली आहे. शिवाय भारताच्या ऍनिमल वेल्फेअर बोर्डने सुद्धा याबाबत सूचना जारी केल्या आहेत. 

त्यामुळे नागरिकांना पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा ऐवजी पर्यावरण पूरक पर्यायांचा अवलंब करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे . प्लास्टिक किया इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजाचा वापर टाळावा. घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणुकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी. वर्षभरात त्याची साठवणूक, हाताळणी व विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी.

पतंग उडवितांना केलेल्या मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होवून आग लागणे, उपकेंद्रे बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जिवीतहानी होणे, इ. बाबींचा विचार करता नायलॉन मांजाचा वापर करु नये. नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या पशु पक्षी यांना उपचाराकरिता भाईंदर पश्चिमेस उड्डाणपूल खाली  "पशु पक्षी केंद्र उ येथे दाखल करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.  

टॅग्स :mira roadमीरा रोडMakar Sankrantiमकर संक्रांती