नालासोपारा : वसई तालुक्यात विशेषत: नालासोपाºयात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. बोगस डॉक्टरांबाबत महापालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागे होत वसई- विरार महापालिकेचे आयुक्त बळीराम पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अधिकाºयांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई सुरू केली. शुक्र वारी तीन बोगस डॉक्टरांवर कारवाई करून तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन परिसरातील वालई पाड्यात बोगस डॉक्टर काही कागदपत्रे नसताना आपले बस्तान मांडून बसल्याची माहिती वैद्यकीय अधिकाºयांना मिळाल्यानंतर डॉ. सुधीर पांढरे, डॉ. स्वाती चिंचोळकर, डॉ. जगदीश महाजन, डॉ. अनया देव आणि डॉ. शाहीन शेख यांच्या पथकाने त्यांच्या क्लिनिकमध्ये छापा घातला. पालिकेच्या या कारवाईचे येथील नागरिकांनी स्वागत केले आहे. या बोगस डॉक्टरांकजून सामान्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता अशी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे.कागदपत्रेच नाहीतवालई पाडा येथील हरी ओम साई क्लिनिक दवाखाना उघडून बसलेल्या डॉ. संजयकुमार बीनदेश्वरी साहू (५०) आणि डॉ. सुनीता संजयकुमार साहू (४१) या पतीपत्नीकडे कागदपत्रे नसल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. तर डॉ. सतीशकुमार सदानंद शर्मा (४१) याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
तीन बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई, आरोग्य विभागाला जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:16 IST