शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
3
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
4
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
5
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
6
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
7
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
8
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
9
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
10
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
11
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
12
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
13
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
14
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
15
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
16
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
17
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
18
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
19
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

खासदारांच्या वसईतील जनता दरबारात वीजेने केला खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:53 PM

जनता दरबार सुरू असतांना तीनवेळा वसई गावातील विद्युत प्रवाह खंडित झाल्याने वीज कंपनी व त्यांच्या अधिकाऱ्यांची पोल चांगलीच उघडी पडली.

वसई : पालघर लोकसभेचे युतीचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी शुक्र वारी वसई तहसील कार्यालयात आपला पहिला-वहिला जनता दरबार आयोजित केला होता. मात्र आश्चर्य म्हणजे हा जनता दरबार सुरू असतांना तीनवेळा वसई गावातील विद्युत प्रवाह खंडित झाल्याने वीज कंपनी व त्यांच्या अधिकाऱ्यांची पोल चांगलीच उघडी पडली.दरम्यान या जनता दरबारात लोकांनी प्रामुख्याने वीज बिले, वाढीव बिले, अधिकारी कर्मचारी वर्गाचा अनागोंदी व मनमानी कारभार आदी असंख्य वीज समस्या सोबत प्रलंबित ६९ गावांचा पाणीपुरवठा प्रश्न: यासह वसई महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रश्न त्यांच्या समोर मांडले. उपस्थित विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यावरील उपाययोजना सुचविली.खरंतर या जनता दरबारात महसूल, वीज आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेली ६९ गावची पाणी योजना हे प्रमुख प्रश्न होते.ते दुर्लक्षित राहिले.त्यावर खास.राजेंद्र गावित यांनी उपस्थितांना ही योजना लवकरात लवकर पूर्णत्वास नेउन कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन लवकरच हा पाणी प्रश्न निकाली लागणार असल्याचे सूतोवाच केले.या दरबाराचे महत्त्व वाढले. कारण येथे अवघ्या ४ महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूका होत असून पैकी पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात युतीला चांगले मताधिक्य मिळून आता युतीचे खासदार निवडून आले, त्यामुळेच सेना भाजपाचे लक्ष आता खासकरून बोईसर, नालासोपारा आणि वसई विधानसभा क्षेत्रावर राहणार आहे.वीज अधिकारी वर्गाची फटफजिती ! तर पालिका आयुक्त उठून जातात तेव्हा ?हा जनता दरबार सुरू असताना देखील याप्रसंगी तीन वेळा महावितरणचा विद्युत प्रवाह खंडित झाला, त्यामुळे उपस्थित महावितरणच्या अधिकाºयांची चांगलीच फटफजिती बघायला मिळाली. याचा फायदा घेत नागरिकांनी आरडाओरड सुरू केला होता. तर यावेळी उपस्थित नागरिकांनी सार्वजनिक प्रश्नासमवेत वसई विरार महापालिका आयुक्त बी.जी.पवार यांना आपले खाजगी प्रश्न देखील विचारायला सुरुवात करून त्यांना घेरण्याचा प्रत्यन केला. मात्र अखेर वैतागून आयुक्त बी.जी. पवार यांनी भर सभेतून काढता पाय घेत निघून जाणे पसंत केलं.