शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

बोर्डीत मक्षिकापालनातून मधूक्रांतीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:44 IST

कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचा स्तुत्य उपक्रम; प्रशिक्षणार्थीस स्वयं रोजगाराची संधी

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : नव्याने मधमाशापालन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे व आधीपासून या व्यवसायात असणाऱ्यांकरिता कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे मधमाशापालन कार्यशाळा आयोजित करण्यात येते. या व्यवसायातून रोजगार निर्मितीसह शेती उत्पादनात वाढ आणि नागरिकांना दर्जेदार मध उपलब्ध होऊ शकते. शिवाय पंतप्रधानांच्या स्वप्नातील मधूक्रांती कार्यक्रमाला त्यामुळे बळकटी मिळणार आहे.या प्रशिक्षणातून मधमाशीपालन हा शेतीला पूरक व जोडव्यवसाय असून शुद्ध नैसर्गिक मधाचे उत्पादन घेता येते. मधमाशांद्वारे परागीभवन घडवून अन्नधान्याच्या व फळबागामध्ये उत्पादनात लक्षणीय वाढ कशी करावी याबाबत माहिती देण्यात येते. त्यानंतर सातेरी, मेलिफेरा आणि डंखरहित जातीच्या पाळीव मधमाशांची योग्य प्रकारे हाताळणी प्रात्यक्षिकासह दाखविण्यात येते. निसर्गात आढळणाºया मधमाश्या पेटीत भरण्याची कला व जंगली मधमाशांपासून मधाचे उत्पादन कसे घ्यावे हे प्रशिक्षणार्थ्यांना शिकविण्यात येते. शिवाय मधमाशांचे शत्रू, रोग व त्यापासून संरक्षण यासह शासकीय योजनाविषयी मार्गदर्शन केले जाते. याशिवाय प्रगतीशील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून शंका निरसन व समाधान होते. याबरोबरीने फार्म व्हिझीट व प्रात्यक्षिकानंतरप्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास मधमाशी हाताळण्याची संधी दिली जाते. दरम्यान याकरिता प्रशिक्षण शुल्क ५०० रुपये आकारण्यात येते. त्यानंतर चहा, न्याहारी, जेवण आणि प्रशिक्षण साहित्य व प्रमाणपत्र देण्यात येते. या पूर्वी हे प्रशिक्षण घेतले असेल आणि पुन्हा प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांना २०० रुपये फी आकारण्यात येते.खादी ग्रामोद्योग मंडळाचा पुढाकारया मंडळामार्फत मानव विकास मिशन कार्यक्र मांतर्गत तालुक्यातील झारली या आदिवासी पाड्यातील दहा युवकांना प्रत्येकी पाच मधपेट्या मधयंत्र व संरक्षण जाळी इत्यादी साहित्याचे विनामूल्य वाटप केले. तसेच शेती उत्पादन वाढीसाठी ४० ते ६० टक्के परागीभवनाकरिता मधमाशांचे संवर्धन महत्त्वाचे आहे. यादृष्टीने खादी ग्रामोद्योग मंडळ ठाणे यांचेमार्फत जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी पी.पी.सावंत आणि कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उत्तम सहाणे तसेच खादी ग्रामोद्योग आचे पर्यवेक्षक संजय पाटील यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.आज शेती क्षेत्र कमी होत असून उत्पादन वाढविण्याकरिता चांगले परागीभवन होणे आवश्यक आहे. त्यामुळे मधमाशा वाचल्या पाहिजेत. पिकाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ मधमाशांमुळे सहज शक्य असल्याने त्यांच्या पालन-पोषण, संवर्धन व संरक्षणास अनन्य साधारण महत्व आहे. कृषि विज्ञान केंद्र व खादी ग्रामोद्योग प्रशिक्षणाचे आयोजन करते. कोसबाडला प्रत्येक महिन्याच्या दुसºया गुरूवारी असे प्रशिक्षण आयोजिले जाते.- प्रा. उत्तम सहाणे, किटकशास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र