शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन, ‘पैसे हवे असल्यास सांगा’ संघटनेचे खुले आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 04:10 IST

जिल्हा परिषदेतील कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रि या होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यावरही त्यांना कार्यमुक्त करण्यास चालढकल करणा-या शिक्षणविभागाच्या (प्राथमिक) विरोधात शनिवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा) च्या वतीने जिल्हा परिषदे समोर आंदोलन केले.

पालघर : जिल्हा परिषदेतील कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रि या होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यावरही त्यांना कार्यमुक्त करण्यास चालढकल करणाºया शिक्षणविभागाच्या (प्राथमिक) विरोधात शनिवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा) च्या वतीने जिल्हा परिषदे समोर आंदोलन केले.ग्रामविकास विभागाच्या शिक्षक बदल्यां संदर्भातील परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेतील कार्यरत २२९ शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या करण्यात आल्या होत्या. ह्या शिक्षकांच्या बदल्या करताना त्यांच्या सर्व कागदपत्रांच्या पडताळणी ही करण्यात आली होती. प्राथमिक शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेतील संबंधित लोकप्रतिनिधी मात्र जिल्ह्यात शिक्षकांची संख्या कमी असल्याचे कारण देत त्यांना कार्यमुक्त करण्यास विरोध दर्शवत आहेत. डहाणूच्या गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकाºयांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याच्या घटनेने शिक्षण विभागातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला होता. पालघर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातही मोठा गोंधळ असल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यातील ४९ शिक्षक जिल्हा बदलीने व ७० शिक्षक समुपदेशाने असे एकूण १२० शिक्षक जिल्ह्यात हजर झाले असताना बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश दिले जात नाहीत. आम्हाला कार्यमुक्त करण्यासाठी पैसे हवे असल्यास तसे सांगा असे खुले आव्हानच शिक्षकांनी ही दिले असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना काही शिक्षकांनी दिली. आमचे कुटुंब सर्व सामानासह बदलीच्या ठिकाणावर पोचले असताना आम्ही इथेच अडकून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी आपल्या संघटनेचे राहुल परदेशी, जिल्हाध्यक्ष दत्ता ढाकणे, मुरली ठेलारी, सोमनाथ कोळी इ.सह शेकडो लोकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर ह्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. ह्यावेळी अन्य समस्याही त्यांच्या पुढे ठेवण्यात आल्यानंतर ह्याचा सकारात्मक विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले.