शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

निलंबन माघारीसाठी स्वाभिमानचे आंदोलन

By admin | Updated: February 21, 2017 05:12 IST

मोखाडा तालुक्यातील शेंड्याची मेट येथील एक शिक्षक आणि केंद्रप्रमुखाचे शिक्षणाधिकार्ऱ्यांनी केलेले निलंबन

पालघर : मोखाडा तालुक्यातील शेंड्याची मेट येथील एक शिक्षक आणि केंद्रप्रमुखाचे शिक्षणाधिकार्ऱ्यांनी केलेले निलंबन अन्यायकारक असून ते तात्काळ रद्द व्हावे यामागणीसाठी शनिवारी महाराष्ट्र स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पालघर जिपच्या शिक्षण विभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शाळा तपासणी व भेटी अंतर्गत २ फेब्रुवारी रोजी जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत आणि गटशिक्षणाधिकारी किरण कुंवर यांनी मोखाड्यातील शेंड्याची मेट केंद्र खोच येथीग शाळेत एकाच दिवशी तीन पथके पाठवून तपासणी केली. पहिल्या दोन पथकांना संबंधित शिक्षकांनी समाधानकारक उत्तरे देऊनही भागवत आणि कुंवर यांनी प्राथमिक शिक्षक राजाराम पाटील आणि केंद्र प्रमुख पांडुरंग वारघडे यांना निलंबित केले होते. वसतिगृहासंदर्भात अनेक चुकीचे आक्षेप ठेवून आकसापोटी ही कारवाई केल्याने शनिवारी शिक्षक संघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. १५ दिवसात हे निलंबन रद्द न केल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा या वेळी देण्यात आल्याचे स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ भोईर यांनी सांगितले. आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांना अ‍ॅट्रॉसिटीच्या धमक्या१प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र तपासणी अंतर्गत शाळांना देण्यात आलेल्या निधीचा योग्य विनियोग होतोय की, नाही. विद्यार्थ्यांची प्रगती होते की, नाही याबाबी तपासण्यासाठी भागवत आपल्या टीम सह गेल्यानंतर हंगामी वसतिगृहाचा बोगस प्रस्ताव सादर करून वसतिगृह सुरु ठेवणे, निधीचा योग्य विनियोग न करणे, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक अधोगती, २० विद्यार्थी अनुपस्थित असणे आदी गंभीर बाबी तपासणी अंती आढळून आल्या.२या तपासणीचा संबंधितांना राग आल्याने त्यांनी ग्रामस्थांना जमा करून गावातील महिलांना पुरु ष अधिकाऱ्यांच्या समोर पाठवणे, अपशब्द वापरणे असे उद्योग सुरु केले. मग आम्ही कार्यालयात येताचा पुन्हा अ‍ॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देण्यात आल्या अशी माहिती शिक्षणाधिकारी भागवत यांनी लोकमतला दिली. त्यामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे ही कारवाई करण्यात आली असून ती योग्य असल्याची माहितीही त्यांनी दिली.