शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन

By admin | Updated: March 31, 2017 05:25 IST

अनेक राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हिएम मशीनमध्ये गोलमाल झाल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मतपत्रिकेद्वारे

पालघर : अनेक राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हिएम मशीनमध्ये गोलमाल झाल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी आज भारत मुक्ती मोर्चाद्वारे पालघर तहसीलदार कार्यालया समोर ‘राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाव’ धरणे धरण्यात आले.ईव्हीएम मशीनला आंतरराष्ट्रीय मान्यता नसून आताच झालेल्या अनेक राज्यातील निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करण्यात आल्याच्या तक्र ारी होत आहेत. त्याबाबत न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. ह्या मशिन्समध्ये सेटींग करण्यात आल्याने मतदारांची वास्तव मते नोंदविण्यात आलेली नाहीत. मतदारांनी नोंदवलेली मते पुन्हा तपासण्याची सोय ह्या मशीन मध्ये नसते.मात्र बॅलेट पेपर मध्ये अशी व्यवस्था असल्याने पारदर्शकता राहते. सुप्रीम कोर्टाने ८ आॅक्टोबर २०१३ मध्ये निवडणूक आयोगाला पेपर ट्रेल लावण्याचे आदेश दिले होते. मात्र तीन वर्षांचा कालावधी उलटूनही निवडणूक आयोगाने त्या आदेशाची अमलबजावणी न करता त्या वादग्रस्त ईव्हीएम मशीनचा वापर सुरू ठेवल्यामुळे निवडणूक आयोगा विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. आज अनेक देशात ईव्हीएम मशीनचा वापर केला जात नाही. मात्र आपल्या देशातच ईव्हीएम मशीनचा आग्रह केला जात असल्याने मतदार आपल्या मतदानाने आश्वस्त असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे देशात मुक्त, निष्पक्ष, आणि पारदर्शी निवडणुका करायच्या असल्यास बॅलेट पेपर च्या आधारेच निवडणूक होणे गरजेचे असल्याच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आज पालघर मध्ये आंदोलन करण्यात आले. त्यात ईव्हीएम हटाओ, बॅलेट पेपर लाओ, लोकतंत्र बचाओ आदी घोषणा देण्यात आल्यात. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. (वार्ताहर)