शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशावर हल्ला करणाऱ्या माथेफिरूस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 23:06 IST

वसईच्या रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलावर एका अनोळखी माथेफिरूने रेल्वे प्रवाशावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली होती

नालासोपारा: वसईच्या रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलावर एका अनोळखी माथेफिरूने रेल्वे प्रवाशावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली होती. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या हल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. रेल्वे पोलिसांनी फरार अनोळखी माथेफिरूविरु द्ध हत्येचा प्रयत्न हा गुन्हा दाखल करून शोध घेत तपास करताना आरोपी दिनेश ओगानिया (२३) या माथेफिरूला पकडले आहे.

वसईत राहणाऱ्या समीर मर्चट (५२) या प्रवाशावर मंगळवारी संध्याकाळी वसई रोड रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरून प्लटफॉर्म क्र मांक ३ वर जात असताना अचानक एका अनोळखी माथेफिरूने त्यांना अडवून त्यांच्यावर टोच्याने छातीवर, खांद्याला, हातावर सपासप वार करुन जखमी केले होते. पोलिसांना घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रण मिळाले होते. त्या आधारे पोलिसांनी विविध खबऱ्यांमार्फत तपास सुरू केला होता. हल्लेखोराने अन्य कुणावरही हल्ला करू नये, याची पोलिसांना भीती होती. त्याचा शोध सुरू असताना तो वसई नवघर पुर्वेच्या संत जलाराम बापू नगर मधील वाघरीपाडा येथील रहात असल्याचे समजले. रेल्वे पोलिसांच्या पथकाने घरात झोपलेला असताना दिनेश ओगानिया याला अटक केले आहे.

नेमकी काय होती घटना...वसईमध्ये राहणारे समीर मर्चट हे मंगळवारी संध्याकाळी चर्चगेटला जाण्यासाठी वसई स्थानकातील पादचारी पुलावरून प्लटफॉर्म क्र मांक ३ वर जात असताना अचानक एका अनोळखी माथेफिरूने त्यांना अडवून त्यांच्यावर टोच्याने छातीवर, खांद्याला, हातावर सपासप वार केले होते. मर्चंट यांना उपचारासाठी वसईच्या खाजगी रु ग्णालयात दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रीया करत त्यांच्या हातात खुपसलेला टोचा काढण्यात आला होता. या हल्ल्याबाबत तेही अनभिज्ञ होत.

टॅग्स :railwayरेल्वेArrestअटक