शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मारेकऱ्याचे फुटेज झाले व्हायरल

By admin | Updated: January 28, 2016 02:22 IST

दादर रेल्वे स्टेशनवर बसलेल्या एका अनोळखी महिलेचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढणाऱ्या हरीष पवार (४५) याला झालेल्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी

पालघर : दादर रेल्वे स्टेशनवर बसलेल्या एका अनोळखी महिलेचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढणाऱ्या हरीष पवार (४५) याला झालेल्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पालघर रेल्वे पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या मारेकऱ्याचा फोटो व्हायरल झाला असून त्याची माहिती पोलीसांना कळवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.पश्चिम रेल्वेच्या दादर स्टेशवरून दि. २४ जाने. संध्याकाळी १६.४५ वा. सुटणाऱ्या दादर-डहाणू मेमतून सफाळे या गावी जाण्यासाठी मृत हरिष पवार व त्याचा फिर्यादी मित्र संतोष भुसारा हे बसले असताना हरीष याने प्लॅटफॉर्मवर बसलेल्या एका अनोळखी महिलेचा आपल्या मोबाईलमधून फोटो काढला. हे त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने साथीदाराला ते सांगितले. त्याने हरीष याची मान दाबून पोटात लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. त्यानंतर आपल्या घरी येत असताना विरार स्टेशनातच हरिष अत्यवस्थ झाला व पालघर स्टेशन येईपर्यंत त्याला मृत्यूने गाठले. संशयीताच्या तपासासाठी शोध मोहीम हाती घेतलेली आहे. लवकरच ती यशस्व होईल असा त्याचा दावा आहे.मारेकऱ्याचे फुटेज झाले व्हायरलपोलिसांना कळवादादर स्टेशनवरील सीसीटीव्हीच्या फूटेजमध्ये या हाणामारीचे चित्रीकरण झाल्यानंतर आरोपी तरूणाचा फोटोही पोलीसांना मिळाला आहे. हा फोटो सध्या व्हॉटस्अ‍ॅपवर फिरत असून त्याची ओळख पटल्यास दादर रेल्वे पोलिसांना याची माहिती कळवावी असे पोलिसांनी कळविले आहे.