शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोनाटोना कंपनीच्या संपाचे घोंगडे भिजतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 23:51 IST

दिड वर्षापासून आहे बंद , शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ, कंपनी सुरू होण्याची चिन्हे नाहीत

- वसंत भोईर वाडा : दि. १२ : या तालुक्यातील डाकिवली व घोणसई या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेली मोनाटोना टायर ही कंपनी गेल्या दीड वर्षापासून बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काम नसल्याने कामगारांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही कंपनी लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी कामगार करीत आहेत.ही कंपनी दुचाकी व चारचाकी टायरचे उत्पादन करणारी आहे. या कंपनीत सुमारे ६०० ते ६५० च्या आसपास स्थानिक कामगार आहेत. विशेषत: कंपनीच्या आजूबाजूच्या गावातील कामगार येथे काम करीत आहेत. मात्र कंपनी प्रशासनाने कुठलेही ठोस कारण न देता कंपनी गेल्या दिड वर्षापूवीॅ बंद केली आहे. त्यामुळे या कंपनीच्या कामगारांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे. काम नसल्याने कुंटुबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा यक्ष प्रश्न कामगारांसमोर उभा ठाकला आहे. विजेचे दर वाढले असल्याने उत्पादन करणे परवडत नसल्याने त्यांनी कारखाने बंद केल्याचा कांगावा कारखानदार करीत आहेत.कंपनीकडून काही दिवसांपूर्वी ती सुरू करण्यासाठी प्रस्ताव आला होता. कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणुकदार इच्छूक आहे. जर का कंपनीने सहकार्य केले तर आम्ही मिटींगसाठी तयार आहोत. स्थानिक कामगारांना रोजगारासाठी वणवण फिरावे लागू नये म्हणून कंपनी सुरू करण्यासाठी कोकण विकास कामगार संघटना कामगारांच्या भल्यासाठी सहकार्य करायला तयार आहोत. मात्र कंपनीकडून पुन्हा संपर्क साधण्यात आलेला नाही.- महेंद्र ठाकरे, सरचिटणीस,कोकण विकास कामगार संघटनाडीप्लस झोनचा फायदा फक्त उकळलावाड्यासारखा अतिमागास भागाचा विकास करणे व येथील सुशिक्षित बेरोजगार तरु णांना रोजगार उपलब्ध करून देणे या उदात्त हेतूने सन १९९२ मध्ये तत्कालीन सरकारने या भागात डी प्लस झोन ही योजना जारी केली. या योजनेत सरकारने कारखानदारांना सवलती दिल्या. या सवलतीचा फायदा घेत अनेक कारखाने येथे आले. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे कारखाने येथे आले. मात्र काही कारखान्यांनी फक्त सवलतीचा लाभ घेऊन आपला गाशा गुंडाळला. तर काही कंपन्या सुरू आहेत. या भागात जवळपास ३५ ते ४० टक्के लोखंड बनविणारे कारखाने आले होते. मात्र यातील बरेचसे कारखाने बंद झाले आहेत.