शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग पिडीतेच्या पतीची आत्महत्या?; झाडाला गळफास घेतलेला मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:02 IST

मनोर जवळील सावळे पाडा कोणढान येथे एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. मात्र त्या दिवसापासून बेपत्ता असलेल्या तिच्या पतीचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

- आरिफ पटेलमनोर : मनोर जवळील सावळे पाडा कोणढान येथे एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. मात्र त्या दिवसापासून बेपत्ता असलेल्या तिच्या पतीचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.मनोर पोलीस ठाण्यात विनयभंग केल्या प्रकरणी उधऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल व पती चा आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावळे पाडा कोंढाणा येथे एका आदिवासी समाजाच्या महिलेवर तिच्या घरात घुसून उधºया सबळा हे १७ डिसेंबरला अतिप्रसंग करीत असतांना त्या वेळी तिचा पती गाव देवीचा कार्यक्र म आटोपून घरी आला. त्याच्यात व उधºयामध्ये हाणामारी झाली. त्या मध्ये त्याच्या पायाला इजा झाली पती अशोक शेलार त्या दिवसापासून गायब होता. त्या विषयी मनोर पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर ला मिसिंगची केस दाखल केली होती. पोलीस शोध घेत असतांना ३१ डिसेंबरला त्याचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला आहे. त्याचे पाय जमिनीला स्पर्श करत असल्यानेही आत्महत्या की खून असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.मनोर पोलीस ठाण्यात विनयभंग व आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनाचे रिपोर्ट आल्यावर पुढील तपास करण्यात येईल असे उपनिरिक्षक ढोले यांनी सांगितले. सध्या संपूर्ण तालुक्यात याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे.