मीरा रोड : खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका ४२ वर्षीय शिक्षकाने ९ वीत शिकणाऱ्या १२ वर्षाच्या विद्यार्थीनीचा सातत्याने विनयभंग केला. या प्रकरणी मीरारोड पोलिसांनी शिक्षकास अटक केली आहे. आरोपीला शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मीरारोड पोलिस ठाणे हद्दीतील राहणारी ही विद्यार्थीनी साईबाबा नगर मधील डिसोझा यांच्या घरी खाजगी शिकवणीसाठी ८ महिन्या पासुन जात होती. शिकवताना बेनट डिसोझा (४२) हा वही तपासण्याच्या बहाण्याने वा अभ्यासाच्या अन्य कारणांनी त्या विद्यार्थीनीस जवळ बोलावुन तिच्याशी अश्लील वर्तन करत असे. सातत्याने होणाऱ्या या प्रकाराने अखेर त्रासलेल्या विद्यार्थिनीने हा प्रकार आईला सांगीतला. या प्रकरणी मीरारोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्या नंतर कारवाई झाली. (प्रतिनिधी)
विनयभंग करणाऱ्या शिक्षकास अटक
By admin | Updated: December 26, 2016 05:56 IST