शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

मोहरम अर्थात हजरत हुसैन यांचा स्मृती दिन, बहिणीमुळे घटना कळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 02:21 IST

इराकची राजधानी बगदादपासून १०० किमी अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे इस्लामीक चळवळीचे एक ऐतिहासिक युध्द झाले. ज्याने इस्लाम धमार्चा चेहरामोहराच बदलून टाकला.

- हुसेन मेमन ।जव्हार : इराकची राजधानी बगदादपासून १०० किमी अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे इस्लामीक चळवळीचे एक ऐतिहासिक युध्द झाले. ज्याने इस्लाम धमार्चा चेहरामोहराच बदलून टाकला. हिजरी संवतचा (इस्लामिक वर्ष ) पहिला महिना म्हणजे मोहरम ! मोहरमच्या १० तारखेला (१० मुहर्रम ६१ हिजरी, अर्थात इ.स.६८० मध्ये) मोहम्मद पैगंबर साहेब यांचे नातू (नवासे ) हजरत हुसैन यांना करबला येथे खलिफा यजीद बिन मुआविया यांच्या साथीदारानी ज्या दिवशी युद्धात मारले होते, तो दिवस म्हणजे 'यौमे आशुरा' होय. याच दिवशी हजरत हुसैन यांच्या वीरमरणाच्या स्मृतीमध्ये मुस्लिम बांधव मोहरम साजरा करतात.हजरत हुसैन यांच्या फौजेमध्ये अनेक लहान मुले होती. अशा परिस्थितीही ते युद्धास सामोरे गेले. अब्बास इब्ने अली हे हजरत हुसैन यांच्या सैन्याचे प्रमुख होते. दुस-या बाजुला यजिद यांच्या सैन्याची कमान उमर इब्ने सईद यांच्या हातात होती. युध्दाचे कारण -इस्लाम धमार्चे पाचवे खलिफा अमीर मुआविया यांनी खलिफाच्या निवडणुकीत समाजाच्या विरोधात जाऊन त्यांचा मुलगा यजिदला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. यजीद हा त्या काळी गुंड म्हणून प्रसिध्द होता. समाजात त्याची प्रतिमा डागाळलेली होती. त्यामुळे त्याकाळच्या मुस्लिम समाजबांधवांना यजीद खलिफा झाल्याचे रूचले नाही. यजिदने समाजाविरूध्द बंड केले पण यजिद समोर मोहम्मद पैगंबर यांच्या परिवारातील हजरत हुसेन यांचे आव्हान होते. कारण ते यजिदसमोर झुकण्यास तय्यार नव्हते. यजिदने हजरत हुसैन यांनी त्याला खलिफा पदासाठी मान्य करण्यासाठी दम दिला. इमाम हुसैन यांनी यजीदला खलिफा म्हणून मान्य न केल्याने करबला या गावावर युद्धाचे ढग गोळा झाले. हजरत हुसेन यांनी आपले मोठे बंधु इमाम हसन यांच्यासोबत आपल्या परिवारील लहान मुले व महिलांसह यजिदशी युद्ध केले. यात हजरत हुसेन यांच्या परिवारातील सर्वजण शहीद झाले. पण पराक्रमी योद्धा असलेल्या हुसेन यांचा ते पराभव करु शकले नाही. युद्धभुमीवर सायंकाळची (असरची) नमाज अदा करत असताना जेव्हा हजरत हुसैन नमाज साठी झुकले तेव्हा यजीदच्या सैन्याने हुसैन यांना शहीद केले. त्यामुळेच हजरत हुसैन यांना 'शहीद-ए-आजम' म्हटले जाते.बहिणीमुळे घटना कळलीयुद्धात वाचलेल्या हजरत हुसैन यांच्या बहिणीमुळे ही घटना सर्व जगताला कळली व त्यानंतर झालेल्या उठावात यजीदचा पराभव झाला.हजरत हुसैन यांनी मुठभर नागरिकांच्या मदतीने त्या काळच्या जाचक हुकूमशाही विरूध्द कंबर कसली होती.