शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नास्ता, जेवणासह आदिवासींसाठी आधुनिक शेती सहल

By admin | Updated: March 10, 2017 03:26 IST

बोरलॉग इस्टिटयुट फॉर साउुथ एशिया (बिसा) व प्रगती प्रतिष्ठान जव्हार यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक १६ ते १८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत येथील आदिवासी

जव्हार : बोरलॉग इस्टिटयुट फॉर साउुथ एशिया (बिसा) व प्रगती प्रतिष्ठान जव्हार यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक १६ ते १८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत येथील आदिवासी शेतक ऱ्यांकरीता शैक्षणिक सहलीचे बिसा फार्म जबलपुर येथे आयोजन केले होते. क्लायमेट स्मार्ट व्हिलेज हा उपक्रम गेल्या वर्षापासून पालघर जिल्हयातील ७० गावांमध्ये बिसा संस्थेद्वारे तसेच मंत्रालयातील आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहभागाने कार्यान्वीत आहे.तसेच पालघर जिल्यातील एकुण १०० इच्छुक तसेच प्रगतशील शेतकरी या शैक्षणिक सहलीकरीता नेण्यात आले होते. यासाठी बिसा व प्रगती प्रतिष्ठान जव्हार यांजकडुन शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी प्रवासाची व्यवस्था, नास्ता , जेवण व रहाण्याची योग्य प्रकारे केली होती. या कृषी सहलीचा मुख्य उद्देश हवामानातील होणारे बदल तसेच संवेदनक्षम शेती करणे, शाश्वत कृषी संवर्धन, विविध प्रकारच्या पीक पदधती व त्यांचे प्रात्याक्षिक त्याच बरोबर आधुनिक कृषी अवजारे विविध सिंचन, जलसंधारण पदधती इत्यादींची माहीती व मार्गदर्शन करण्यात आले.या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे बदलत्या हवामानामुळे होणारा कृषी पदधती व मानवी जीवन तसेच सभोवतालच्या वातावरणाचा होणारा दुष्परिणाम व त्यासाठीच्या उपाययोजना यासाठीचे सुसुत्रीकरण हा होता. तसेच हा अभ्यास दौरा डॉ. पंकजसिंग स्टेशन समन्वयक व डॉ.राजकुमार जाट अ‍ॅग्रोनॉमिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आला होता. याबाबत शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर शेतकऱ्यांनी मिळालेले मार्गदर्शन हे एक अतिशय प्रभावी व मोलाचे असून आम्ही याचा अवलंब निश्चितच करू असे म्हटले आहे. तसेच संस्थेमार्फत केलेल्या सर्व सोयी व मार्गदर्शनामुळे आम्ही या दोन्ही संस्थांचे आभारी आहोत याचाही उल्लेख शेतकऱ्यांनी या ठिकाणी केला आहे. तसेच अशाच प्रकारच्या सहली अगर मार्गदर्शन केल्यास आपला पालघर जिल्हा प्रगतीच्या वाटेवर राहील, अशी विनंती देखील या वेळी करण्यात आली. (वार्ताहर)