शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रेशनचा २२ गोण्या गहू मनसेने पकडला, बचत गटाच्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:50 IST

दातिवरे येथील माता रमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री मोहन वर्तक यांच्या रेशिनंग दुकानातील ११ क्विंटल (२२ गोणी) गहू टेम्पो मधून काळाबाजारात

पालघर: दातिवरे येथील माता रमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री मोहन वर्तक यांच्या रेशिनंग दुकानातील ११ क्विंटल (२२ गोणी) गहू टेम्पो मधून काळाबाजारात विक्र ी करण्यासाठी नेत असतांना स्थानिकांसह मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा तोे पकडून केळवे सागरी पोलिसांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिला विरोधात गुन्हा दाखल केला आहे.दातिवरे येथील रमाबाई महिला बचत गटाच्या गोदामातून रात्री १0 च्या सुमारास एका टेम्पोत धान्य भरले जात होते. त्याचा संशय येऊन ग्रामस्थ आणि दातिवरे येथे मनसेचे पालघर तालुका उपाध्यक्ष चेतन वैद्य, पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत, केळवा विभाग अध्यक्ष संदीप किणी, उपविभाग अध्यक्ष सचिन किणी, हेमंत घोडके, अध्यक्ष हर्षल पाटील, सचिन भोईर, वैभव वसईकर, शिवसेना सरपंच ज्योती तामोरे आणि मनसे उपसरपंच विजया राऊत, ग्रामपंचायत सदस्य गौतम वर्तक, रविंद्र भोईर, तसेच पंकज पाटील, प्रशांत ठाकूर, परेश भोईर, ग्रामस्थ आणि मनसे सैनिकांनी हा टेम्पो रंगेहात पकडून मालासह केळवा सागरी पोलीस ठाण्यात जमा केला. या गव्हाची किंमत २६,४९९ रूपये असून, पुरवठा अधिकारी तडवी यांनी केलेल्या या कारवाईत माता रमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री मोहन वर्तक आणि सचिव रिया रूपेश राऊत यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये केळवे पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे. निकृष्ट माल ग्राहकांच्या माथी मारणे, माल न देताच तो दिल्याची कागदोपत्री नोंद करणे, रॉकेल आणि धान्य काळ्या बाजारात विकणे असा गैरप्रकार रेशनिंग दुकानांतून चालतो, हे महसूल प्रशासनाला चांगले माहीत असूनही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा स्पष्ट आरोप मनसेचे पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत यांनी केला आहे. या भ्रष्ट रेशनींग दुकानदाराचा परवाना रद्द करण्या बाबतची मागणी तालुका पुरवठा अधिकारी तडवी यांच्याकडे केली आहे.