शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आगीतील बेघरांचे पुनर्वसन करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी 

By धीरज परब | Updated: February 28, 2024 20:22 IST

आ. सरनाईक यांनी घटनास्थळाची पाहणी करून दुर्घटनाग्रस्तांचे सांत्वन केले.

मीरारोड- भाईंदर पूर्वेच्या आझाद नगर येथील बुधवारच्या भीषण आगीत सुमारे ५० ते ६० झोपड्या जळून बेघर झालेल्यांचे महापालिकेने एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. आ. सरनाईक यांनी घटनास्थळाची पाहणी करून दुर्घटनाग्रस्तांचे सांत्वन केले . शिवसेनेच्या वतीने बेघरांच्या जेवण, नाश्ताची व्यवस्था करण्यात आली. 

आगीत सर्वकाही भस्मसात झाल्याने बेघर लोकांचे एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील घरांमध्ये तात्पुरते पुनर्वसन करावे अशी मागणी आ. सरनाईक यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्दाद्वारे केली.  त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तात्काळ मुख्यमंत्री यांच्या लक्षात ही बाब आणून देतो आणि त्यांच्या माध्यमातून प्रशासनास निर्देश देण्यास सांगतो असे उत्तर दिल्याची माहिती आ . सरनाईक यांच्या कार्यालयातून देण्यात आली. 

दरम्यान आ. सरनाईक सह शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर आदींनी घटनास्थळी पाहणी केली. आगीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेत ज्यांच्या झोपड्या आदी जळाल्या त्यांच्याशी चर्चा करत मदतीचे आश्वासन दिले. आझाद नगर झोपडपट्टी अनेक वर्षांपासून आहे. महापालिकेच्या सामाजिक वनीकरण व खेळाचे मैदान साठी आरक्षित जागेत या २५० ते ३०० झोपडया आहेत.  या झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करावी असे आ . सरनाईक यांनी पालिका अधिकाऱ्यांना सांगितले. 

आ. सरनाईक यांनी येथील नागरिकांच्या जेवण , चहा - नाश्ताची व्यवस्था केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या कडून घटनेची व जखमींच्या प्रकृती चौकशी केली. आगीमुळे ज्यांचे घर गेले आहे ते कोणीही बेघर होणार नाही असे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले असल्याचे आ . सरनाईक यांनी सांगितले. 

टॅग्स :mira roadमीरा रोडpratap sarnaikप्रताप सरनाईक