शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

मीरारोडला स्त्री बोगस डॉक्टरला अटक

By admin | Updated: August 30, 2016 02:19 IST

मीरा रोड, दहिसर भागांत १२ वर्षे डॉक्टर म्हणून व्यवसाय करणारी तसेच दहिसर लायन्स क्लबची अध्यक्षा सुनीता प्रवीण छाजेड ही बोगस डॉक्टर असल्याचे उघड झाले आहे.

मीरा रोड : मीरा रोड, दहिसर भागांत १२ वर्षे डॉक्टर म्हणून व्यवसाय करणारी तसेच दहिसर लायन्स क्लबची अध्यक्षा सुनीता प्रवीण छाजेड ही बोगस डॉक्टर असल्याचे उघड झाले आहे. काशिमीरा पोलिसांनी तिला अटक केली आहे. भार्इंदर पूर्वेलाही एका बोगस डॉक्टरला अटक केली आहे. दहिसर, कांदिवली तसेच मीरा रोड परिसरात स्वत:ला डॉक्टर तसेच गायनाकोलॉजिस्ट म्हणवणारी सुनीता उघडपणे वैद्यकीय व्यवसाय करत आहे. शिवाय, लायन्स क्लब दहिसरची अध्यक्षा असून क्लबच्या माध्यमातून वैद्यकीय शिबिरे घेते. मिळालेल्या माहितीनंतर संस्थेच्या सदस्या तथा दंतचिकित्सक असलेल्या डॉ. माया पाटील या स्वत: रुग्ण म्हणून सुनीताच्या घरी गेल्या. सुनीता हिने आपण एमडी गायनॅक असल्याचे सांगून तपासणी केली. सोनोग्राफी करावी लागेल, रक्त-लघवी तपासणी करून घ्या, असे सांगत लॅबची चिठ्ठी व औषधे लिहून दिली. खात्री पटल्याने संस्थेचे सचिव गणेश फडके आणि सदस्यांनी महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, डॉ. अंजली पाटीलसह सुनीता हिच्या निवासस्थानी धाड टाकली. त्या वेळी अन्य रुग्णही तपासणीकरिता आले होते. शनिवारी सायंकाळी काशिमीरा पोलीस ठाण्यात डॉ. जाधव यांच्या फिर्यादीनंतर सुनीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनीताकडे डी. फार्मची पदवी असून वैद्यकीय व्यवसायाची कुठलीही पदवी नसल्याचे स्पष्ट झाले. सुनीताचा पती प्रवीण डॉक्टर म्हणून दहिसरमध्ये दवाखाना चालवतो. शिवाय, मीरा रोडच्या विजय पार्कमध्ये छाजेड हे साईयश नावाचे रुग्णालय चालवत होते. दरम्यान, या संस्थेने भार्इंदर पूर्वेतून एक बोगस डॉक्टर पकडून दिला. मोहम्मद हदीस शेख (४३) असे त्याचे नाव असून तो जैननगरमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत होता. (प्रतिनिधी)