शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीची वसईत सुखरूप सुटका

By admin | Updated: August 20, 2016 04:27 IST

बांगलादेशातील ढाका येथून नोकरी देण्याच्या आमिषाने वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या अल्पवयीन मुलीला मुंबईहून सुरतला विक्री करण्यात आले होते. त्या मुलीला सुरतला नेताना

विरार : बांगलादेशातील ढाका येथून नोकरी देण्याच्या आमिषाने वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या अल्पवयीन मुलीला मुंबईहून सुरतला विक्री करण्यात आले होते. त्या मुलीला सुरतला नेताना वसईच्या रेल्वे पोलिसांनी दलालासहित ताब्यात घेतले आहे. यातून आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.सचिन प्रकाश पाटील उर्फ सोनू (२८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यामार्फत पिडीत मुलीला सुरतला पाठवण्यात येत असताना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पिडीत अल्पवयीन मुलगी बांगलादेश मधील ढाका येथील आहे. अतिशय हलाखीची स्थिती आणि अज्ञानतेचा फायदा घेऊन नोकरीच्या आमिषाने तिला १९ मे २०१६ रोजी मुंबई आणले होते. मुंंबईच्या कामाठीपुरा येथे आणून तिची विक्री केली. तेथून तिला सूरत येथील एका व्यक्तीला एक लाख तीस हजारात वेश्या व्यवसायासाठी विकण्यात आले. सूरतला नेण्याच्या आदल्या दिवशी त्या मुलीली बाभोळा येथे एका फ्लॅटमध्ये ठेवण्यात आले होते. गुरुवारी सकाळी वसई रेल्वे स्थानकात फलाटावर गस्त घालणाऱ्या रेल्वे पोलिसांना पाहून पिडीत मुलीने आरडाओरडकरून पोलिसांचे लक्ष वेधून घेतले. पोलिसांनी तिची चौकशी सुरु केली असता तिच्या सोबत असलेला एक व्यक्ती पळून जाऊ लागला. त्यालाही पोलिसांनी अटक करून चौकशी केली असता या मुलीला बांगलादेशातून आणून वेश्याव्यवसाय करण्यात लावल्याचे उजेडात आले. पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला बोईसर येथील रेस्नयू फाऊंडेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर अटक आरोपीवर विविध कलम आणि पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला. आरोपी आणि पिडीत मुलीने सेक्स रॅकेटसंबंधी अनेक महत्वाची माहिती दिल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पिडीत मुलीच्या माहितीनुसार रॅकेटमध्ये आठ ते दहा जणांचा समावेश असून बांगलादेशहून अनेक मुली आणल्या आहेत. याला आरोपीनेही दुजोरा दिल्याचे पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. त्यामुळे एक मोठे आंतरराष्ट्रीय हे रॅकेट चालवणारी एक टोळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.