शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ग्रामीण भागातही विवाह सोहळ्यांवर लाखोची उधळपट्टी

By admin | Updated: May 21, 2017 03:33 IST

पालघर जिल्हातील जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा, डहाणू, वसई, पालघर, तालुक्यातील विवाह सोहळ्यांवर सध्या केवळ बडेजाव मिरविण्यासाठी लाखोंची उधळपट्टी

- राहुल वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कविक्र मगड : पालघर जिल्हातील जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा, डहाणू, वसई, पालघर, तालुक्यातील विवाह सोहळ्यांवर सध्या केवळ बडेजाव मिरविण्यासाठी लाखोंची उधळपट्टी वधू व वरपक्ष कर्जबाजारी होऊन सध्या करीत आहे. हा समाज शेती हाच व्यवसाय करत असल्याने त्याचे उत्पन्न अल्प आहे. त्यात यंदा पीककर्ज मिळण्याची मारामार आहे. तरीही केवळ अनुकरण म्हणून अथवा समाजाच्या दबावापायी सर्वच समाजातील विवाह सोहळ्यात दोन दिवसात लाखोंचा चुराडा होतो आहे.खोट्या श्रीमंतीच्या, प्रतिष्ठेच्या आहारी जाऊन वधूपिते सोने अथवा शेतजमिन विकणे अथवा गहाण ठेवणे, हा मार्ग पत्करून विवाहासाठी कर्ज काढत आहेत. त्याची परतफेड करायची कशी? याचा मात्र कोणताही विचार त्यांनी केलेला नाही. डी.जे., बँड, मंडप, स्टेज, लग्न पत्रिका, कॅटरर, चिकन, मटणाची जेवणावळ, आईस्क्रीम, कपडालत्ता आदींचे भाव प्रचंड वाढले असले तरी अनेक समाजात कर्जे काढू पण लग्न थाटात करूया बडेजावाने खर्च होत आहे. स्वस्तातला बँजो नाकारून हजारो बिदागीच्या डीजे साठी वऱ्हाड मंडळीत चुरस सुरु आहे. संपूर्ण वर्षभर सणावाराला खिशाला चाट देणाऱ्या मध्यमवर्गीयांचा विवाह सोहळाही डोळे पांढरे करणारा असतो. साक्षींगध व साखर पुड्यासाठी वेगळाच पायंडा तयार होत आहे. मध्यमवर्गीयांच्या लग्नाची रोकड साखरपुड्याच्या सोहळ्यातच खर्च होते आहे. हजारो रुपयांचे मानाचे कपडे वधू पक्षाकडील मंडळीना खरेदी करावे लागत आहे. भला मोठा मंडप, नाहीतर लॉन महागडी आकर्षक लग्नपत्रिका, मांसाहारी मेजवानी, आईस्क्रि म या बाबी अपरिहार्य आहेत. अनेकांनी नातेवाईकांकडून कर्जे घेतली तर काहींनी भरमसाठ व्याजाची पर्सनल लोन घेतली आहेत. पण त्याच्या परतफेडीचा विचार मात्र कोणी करत नाही. त्यामुळे विवाहात मिळालेल्या चैनी वस्तूंची विक्री कर्जफेडीसाठी करायची वेळ येते आहे.लग्नासाठी लागणारे साहित्य - बँजो २० ते २५ हजार रु , - स्टेज, खुर्च्या, लायटिंग १३ ते १५ हजार, - मंडप २४ ते २५ हजार, - जेवणाचे टेबल व खुर्च्या ७ ते ८ हजार रु, - वरातीसाठी लागणाऱ्या बसेस व खाजगी गाड्या १० ते १२ हजार, - जेवणासाठी लागणाऱ्या भांड्यांचे भाडे ७ ते ८ हजार, - जनरेटर भाडे ३ ते ५ हजार रु .- लग्न पत्रिका (१०००) १२ ते १४ हजार, - महागाईमुळे मटणाचे भाव वाढल्याने १०० किलो मटणासाठी २४ ते २५ हजार रु पये मोजावे लागत आहेत, त्यात विदेशी मद्य, आईस्क्रि म याची भर पडल्यास एकूण ३ ते ४ लाख रु पये खर्च होत असल्याने वधू-वर पक्षाचे कंबरडे मोडले आहे यावर सामुहिक विवाह हा एकमेव उपाय ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे यामुळे महागाईच्या काळात सुध्दा वधू वर पक्षाकडून होणाऱ्या विवाह खर्चात बचत होऊन जमिनी विक्री, दागिने गहाण टाकण्याची वा कर्जे घेण्याची वेळ येणार नाही असे जाणकारांचे मत आहे .ग्रामीण भागात प्रामुख्याने शेती हेच उदरनिर्वाह साधन आहे. परंतु सध्या तीच धोक्यात आली आहे. त्यामुळे कर्जबाजारी होण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे अन्य मार्ग नाही. लेकीच्या विवाहाच्या कर्जाची फेड मुलाच्या विवाहातून करण्याची अनिष्ट प्रथाही रुजते आहे.-डॉ. सतोष भरसट, एमडी, विक्र मगडमध्यमवर्गीयांनी महागाईच्या काळात सामूहिक विवाह पद्धती अनुसरावी त्यामुळे दोन्ही पक्षाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल.-सरस्वती नडगे, भोये, महिला दक्षता कमिटी अध्यक्षसमाज प्रबोधन करून अनेक समाज संघटनानी सामूहिक विवाह सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करायला हवे तरच विवाहातून कर्जबाजारी होण्याची पाळी टाळता येईल.ङ्क्त- प्रकाश चौधरी, रा.स्व.संघाचे कार्यकर्ते विक्र मगड