शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
4
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
5
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
6
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
7
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
8
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
9
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
10
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
11
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
12
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
13
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
14
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
15
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
16
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
17
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
18
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
19
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

कोट्यवधींच्या ठगास अटक

By admin | Updated: October 7, 2016 04:59 IST

ध्यमवर्गीय कुटुंबीयांना माफक दरामध्ये घर देण्याची आकर्षक योजना व आमिषे दाखवून त्यांच्याकडून धनादेश सुमारे ६० ते ७० कोटी रुपयांची रक्कम घेऊन पसार झालेल्या

विरार : मध्यमवर्गीय कुटुंबीयांना माफक दरामध्ये घर देण्याची आकर्षक योजना व आमिषे दाखवून त्यांच्याकडून धनादेश सुमारे ६० ते ७० कोटी रुपयांची रक्कम घेऊन पसार झालेल्या म्होरक्याला तेरा महिन्यांनी पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतील हुतात्मा चौकातून अटक केली. मोहमद आजम अब्दुल अजीम खान असे म्होरक्याचे नाव आहे. मेसर्स आयोनिक (इकोसिटी) रिअ‍ॅलिटी प्रा.लि. आणि मेसर्स क्रिस्टल होमकॉन प्रा.लि. या दोन कंपन्यांनी विरारजवळील बोळींज येथे गृह प्रकल्पाची योजना आखली होती. या प्रकल्पामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबीयांना माफक दरात घर देण्याची आमिषे दाखवण्यात आली होती. या दोन्ही कंपनींच्या भुलथापांना बळी पडून आयोनिक (इकोसिटी) रिअ‍ॅलिटी प्रा.लि. या कंपनीने जवळपास १ हजार ४०० लोकांकडून आणि मे.क्रिस्टल होमकॉन प्रा.लि. या कंपनीने सुमारे ४०० ते ५०० लोकांकडून सुमारे ६० ते ७० कोटी रुपयाची रक्कम उकळली होती. या दोन्ही कंपन्यांनी मिळून जवळपास सुमारे दोन हजार लोकांची फसवणूक केलेली आहे. आतापर्यंत फसवणूक झालेल्या १ हजार १०३ लोकांनी कंपनी विरोधात पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात दोन्ही कंपन्यांविरोधात विविध कलम आणि मोक्का अ‍ॅक्टसह एमपीआयडी कायदा सन १९९९ चे कलम ३, ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक टाळण्यासाठी या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी मोहमद आजम अब्दुलअजीम खान याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने तो फेटाळल्याने तो १३ महिन्यांपासून फरार होता. अटक टाळण्यासाठी मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरत होता. त्याने अनेक वेळा पोलीसांना गुंगारा देखील दिला होता.याप्रकरणी पालघर पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांना आरोपी मोहमद आजम अब्दूल अजीम खान यास अटक करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ते मागावर होते. आरोपीला अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेश, दिव-दमण, पुणे हा भाग पिंजून काढला होता. अखेर आरोपी हा मुंबईत असल्याची पक्की खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर त्याला मुंबईतील हुतात्मा चौकाजवळून अटक केली. (वार्ताहर)मे.आयोनिक (इकोसिटी) रिअ‍ॅलिटी प्रा.लि. व मे.क्रिस्टल होमकॉन प्रा.लि. या कंपनीमध्ये घर खरेदीसाठी ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. तसेच आजपर्यंत पोलीसांकडे फसवणूक झाल्याची तक्रार केलेली नाही अशा व्यक्तींनी लवकरात लवकर आर्थिक शाखा पालघर येथे कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक नारायण पाटील यांनी केले आहे.