शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महिला कबड्डीपटूंचा उतरविणार दीड लाखांचा वैद्यकीय विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:55 IST

डहाणू तालुका कबड्डी असोसिएशनने युवा महिला कबड्डीपट्टूंचा प्रत्येकी दीडलाखाचा वैद्यकीय विमा काढला

बोर्डी  - डहाणू तालुका कबड्डी असोसिएशनने युवा महिला कबड्डीपट्टूंचा प्रत्येकी दीडलाखाचा वैद्यकीय विमा काढला असून त्याचे वाटप असोसिएशनचे अध्यक्ष वलकेश राऊत आणि सदस्य विक्रांत म्हात्रे, वैशाली सावे व प्रशिक्षक यशोधन पाटील आदींच्या हस्ते नरपडच्या अ. ज.म्हात्रे विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले.महिला कबड्डी खेळाडूंकरिता हा उपक्र म राबविणारी जिल्ह्यातील ही पहिली असोसिएशन आहे. यामध्ये साक्षी विपुल सावे (बोर्डी), मानसी कल्पेश राऊत (वाणगाव), शिल्पा अशोक भुसारा (वाणगाव), मंजू रमेश मराड (सोगवे), उर्वशी जयप्रकाश मर्डे (गुंगवाडा), श्वेता कमलाकर दवणे (गुंगवाडा), रिद्धी दीपक धानमेहेर (कासा), क्षितिजा मंगेश राऊत (वरोर), प्रचिता जलाराम घरत (कासा), प्रमिला चंदू भोये (कासा), जागृती संजय आरदोरी (घोलवड), किरणाली नितीन पाटील (वरोर), प्रियंका योगेश राऊत (नरपड), जानव्ही राजेंद्र तांडेल(नरपड), प्रांजली राम दुबळा (डहाणू) या पैकी क्षितिजा इंजिनियर असून नोकरीला आहे. तर अन्य महाविद्यालयस्तरावर विविध ज्ञान शाखेत शिक्षण घेत आहेत.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार व प्रसार चांगल्या प्रकारे झाला आहे. या उपक्रमामुळे कुटुंबीयांचाही सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. शिवाय खेळाच्या माध्यमातून नोकरीच्या संधींना गवसणी घालता येईल असा विश्वास या कबड्डीपट्टूनी व्यक्त केला. त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता असोसिएशन नेहमीच कटीबद्धसल्याचे प्रतिपादन वलकेश राऊत यांनी केले. यामुळे खेळाडूत आनंद निर्माण झाला आहे.महिला कबड्डीचा प्रचार-प्रसार व्हावा असा असोसिएशनचा प्रयत्न असून त्या अंतर्गत हा उपक्र म राबविण्यात आला. कबडीपट्टू आणि त्यांच्या कुटुंबियांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.- वलकेश राऊत (अध्यक्ष, डहाणू तालुका कबड्डी असोसिएशन)

टॅग्स :Kabaddiकबड्डीVasai Virarवसई विरार