शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपाची कारणे शोधण्यात यंत्रणा अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:34 IST

या व डहाणू तालुक्याच्या काही गावात गेल्या काही दिवसां पासून जोरदार भूकंपाचे धक्के बसत असल्याने लोकांची झोप उडाली

- सुरेश काटेतलासरी : या व डहाणू तालुक्याच्या काही गावात गेल्या काही दिवसां पासून जोरदार भूकंपाचे धक्के बसत असल्याने लोकांची झोप उडाली असून ग्रामस्थ रात्र रात्र घराबाहेर जागून काढत आहेत. भूकंपाची भीती निर्माण झालेली असतांना शासकीय यंत्रणा मात्र अजूनही झोपेत आहे, लोकांच्या मनातील भीती काढून भूकंपाची कारणे शोधण्यास ती अपयशी ठरली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असणाऱ्या धुंदलवाडी भागात पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे शनिवारी येऊन ग्रामस्थांच्या भेटी घेऊन गेले अन पायगुण म्हणा रविवार पहाटे पुन्हा भूकंपाचे तीन जोरदार धक्के बसले, बाकीच्या लोकप्रतिनिधींना धक्का न बसल्याने ते अजून भूकंप पीडितांची भेट घेण्यास आले नाहीत कदाचित निवडणुकीत मतदार त्यांना कधी व कसा धक्का देतात याची ते वाट बघत असावेत.दोन तीन महिन्यांपासून या भागात गूढ आवाज येत असल्याच्या जनतेच्या तक्र ारी होत्या पण शासकीय यंत्रणा त्याची दखल घेत न्हवती, पण पंधरा दिवसां पासून जोरदार धक्के बसू लागल्याने जागी झालेली शासकीय यंत्रणा या भागात दिसू लागली, पालघर जिल्हाधिकाºयांनी आपत्त कालीन यंत्रणेला या भागात मार्गदर्शन करायला पाठविले पण या भूकंपाची कारणे काय ती शोधून काढून लोकांच्या मनातील भीती दूर करण्यास मात्र शासकीय यंत्रणा अपयशी ठरली, जिल्हाधिकाºयांनी हे भूकंपाचे धक्के ३ रिश्टर स्केलचे असल्याने घाबरायचे कारण नाही असे सांगितले.>तीव्र धक्का बसेपर्यंत आपत्कालीन यंत्रणा बेसावध?पाच रिश्टर स्केल पेक्षा जास्त तीव्रतेचा धक्का धोकादायक असतो, त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबसह त्याची यंत्रणा ही सुस्त झाली आहे. ही यंत्रणा ५ रिश्टर अथवा त्या पेक्षा जास्त स्केलचा धक्का बसून जीवितहानी होण्याची वाट बघते आहे काय? असा सवाल जनता करते आहे.धुंदलवाडीच्या मुंबई पाड्यातील रहिवासी तर घरे दारे सोडून निघून गेले आहेत त्याच्या घरांना कुलूपे लागली असून पाडा निर्मनुष्य झाला आहे ते कुणीकडे गेलेत याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष आहे, हळदपाड्यातील लोक रात्र घराबाहेर बसून काढत आहेत, त्याकडेही यंत्रणांचे दुर्लक्ष आहे.