शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावरील मांसविक्री थांबली

By admin | Updated: May 5, 2017 05:33 IST

वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील उघड्यावर होणारी मांस विक्री तातडीने थांबविण्याचे आदेश महापालिकेने दिले असून जो

पारोळ : वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील उघड्यावर होणारी मांस विक्री तातडीने थांबविण्याचे आदेश महापालिकेने दिले असून जो कोणी ते मोडेल त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याच्या लेखी नोटीसा अशा दुकानांना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे बंदिस्त दुकानातूनच मांस विक्री करता येणार आहे. शहरातील उघड्यावर होणारी मांस विक्र ी आणि त्यामुळे होणाऱ्या अस्वच्छतेची दखल महापौर कार्यालयाने घेतली असून त्याबाबत योग्य कारवाईचे आदेश वसई विरार महापालिकेस दिले आहेत. शहरात जेथे कोठे असेल अवैध कत्तलखाने असतील तर ते त्वरित बंद करा, मटणाची दुकाने रस्त्यावर उघाडे दिसता कामा नये, दिसल्यास तुम्ही दोषी ठराल, अशी आदेश वजा ताकीद महापौर प्रविणा ठाकूर यांनी आरोग्य विभागाला दिली आहे. वसई तालुक्यात कत्तलखाने नाहीत मात्र जागोजागी मटणाची दुकाने आहेत. ही दुकाने उघड्यावर असल्याने तेथून ये-जा करणाऱ्या नागरीकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच कापलेले मटण उघड्यावर टांगून ठेवण्यात येत असल्याने या मटणावर माशा बसतात, रस्त्यावरची धूळ बसते आणि तसेच त्याची विक्री होते. त्यातून परिसरात अस्वच्छताही निर्माण होते. म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.१५ दिवसांत दुकाने बंदिस्त करा!वसई तालुक्यातील या प्रकाराची तक्र ार अलीकडेच महापौर कार्यालयाकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन महापौरांनी सक्त निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागाने या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. १५ दिवसात दुकाने बंदिस्त करावीत तसेच अनिधकृत दुकाने अधिकृत करुन घ्यावित अशा सूचना पाठविल्या असल्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी सुखदेव दरवेशी यांनी लोकमतला सांगितले.